बारामती : (Ajit Pawar Funeral) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. २८ जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (Ajit Pawar Funeral)
या प्रचंड गर्दीत एक दृश्य सर्वांचं काळीज पिळवटून टाकणारं ठरलं. अजित दादांचा लाडका सूरज चव्हाण देखील शेवटचा निरोप देण्यासाठी बारामतीत पोहोचला होता. कोणाच्याही नजरेत न पडता दादांना अखेरचं पाहता यावं, यासाठी सूरज चव्हाणने चेहऱ्यावर रूमाल बांधला होता. इतर सामान्य नागरिकांप्रमाणेच तो रांगेत उभा राहून अजित दादांच्या शेवटच्या दर्शनाची वाट पाहत होता. लाखोंच्या गर्दीत तासनतास उभा राहूनही सूरज शेवटपर्यंत संयमाने वाट पाहत राहिला. (Ajit Pawar Funeral)
मात्र दुर्दैवाने गर्दी आटोप्यात येईपर्यंत अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू झाले होते. पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर सूरज चव्हाण दर्शनासाठी पुढे गेला, पण त्याला दादांचं अखेरचं दर्शन घेता आलं नाही. अत्यंत जड अंत:करणाने सूरजने अजित दादांच्या जळत्या चितेसमोरच डोकं टेकवलं. हा क्षण पाहून उपस्थित अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. (Ajit Pawar Funeral)
<!-- Inject Script Filtered -->
अंत्यसंस्कारानंतर सूरज चव्हाणने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “आई-वडिलांनंतर मी तुमच्यात माझे आई-आप्पा पाहात होतो आणि तुम्ही पण मला सोडून गेलात. आता या पोरक्या सूरजने कोणाकडे बघायचं… MISS YOU DADA,” असे शब्द लिहित सूरजने आपल्या वेदना मोकळ्या केल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Ajit Pawar Funeral)