Cultural Salute To The Soldiers : सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना सांस्कृतिक 'सलामी'

    29-Jan-2026   
Total Views |
Cultural Salute To The Soldiers
 
मुंबई : (Cultural Salute To The Soldiers) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सीमेवर तैनात असणाऱ्या जिगरबाज जवानांची करमणूक करण्याची धाडसी संकल्पना २००२ साली सफरसम्राट दिवंगत राजा पाटील यांनी अमलात आणली. राजा राणी ट्रॅव्हल आणि महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यासने संयुक्त रित्या त्याचे आयोजन केले होते. तो आजतागायत चालू आहे. यंदा या उपक्रमाचे २४ वे वर्ष आहे. सिमारेषांवरील सीमा सुरक्षा बलाच्या सैनिकांसाठी या अभिनव 'सलामी' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षी 'सलामी' हा उपक्रम १ ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ४८ कलावंत व तंत्रज्ञ यांच्या सोबत राजस्थान राज्यातील जोधपूर, पोकरण, जैसलमेर, ब्रम्हसर, रामगढ, बबलीयानवाला, खाजूवाला, सांचू, बिकानेर या सीमावर्ती भागातील सीमा सुरक्षा बलच्या जवान व त्यांच्या कुटुंबीयांच्या करमणुकी करीता संपन्न होणार आहे. कडवी सैनिकी शिस्त, देशा प्रति असलेला आदर, कर्तव्य सारे काही यानिमित्ताने आठवायला लागते. घर, कुटुंबापासून दूर राहून प्राणपणाने देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची त्यागी वृत्ती या सैनिकात ठासून भरलेली असते. मुंबईकरांनी सादर केलेल्या या कार्यक्रमांमध्ये त्या त्या विभागातील सैनिक सुद्धा उस्फूर्तपणे कार्यक्रमात सहभागी होऊन आपली कला दाखवत असतात. मुक्ता इव्हेंट अँड हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. यांच्या आयोजनातून या दोन्ही संकल्पना यशस्वी होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, यांच्यासह अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले आहे.(Cultural Salute To The Soldiers)
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.