Ajit Pawar Plane Crash : पश्चिम महाराष्ट्रात अजित दादानी वाढवलेली राष्ट्रवादी...
28-Jan-2026
Total Views |
मुंबई : (Ajit Pawar Plane Crash) पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच बालेकिल्ला राहिलेला आहे. यातही विशेषता अजित दादा यांना मानणारा गट मोठा असून पक्षाची बहुतांशी आमदार अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. सांगली, सातारा आणि कोल्हापूर मधील स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी साखर कारखाने तसेच गोकुळ सारखी मोठी दूध संस्था देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात सत्तेत होती. चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील, कागलचे आमदार आणि विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ तसेच भुदरगड चे माजी आमदार के पी पाटील यांसह अनेक मोठे नेते अजित पवार यांचे नेतृत्व मानत होते. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,सांगली बँक यांसारख्या मोठ्या बँका देखील राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. सहकार आणि सत्ता हे समीकरण ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस त्याबाबत कायमच पश्चिम महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर राहिली होती.(Ajit Pawar Plane Crash)