महाराष्ट्राच्या विकासासाठी अजित पवारांचे योगदान ऐतिहासिक - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
"बारामती येथील विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याचे वृत्त अत्यंत क्लेशदायक आहे. त्यांचे अकाली जाणे हे राज्याच्या विकासासाठी नुकसानकारक आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीत, विशेषतः सहकारी क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक आहे."(Ajit Pawar Plane Crash)
अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी - मंत्री मंगलप्रभात लोढा
"मंत्रिमंडळातील माझे सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारे आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. जनसेवेसाठीची अखंड तळमळ, प्रशासनावरची पकड आणि शिस्तप्रिय नेतृत्व ही त्यांची ओळख होती. तळागाळापर्यंत पोहोचलेला त्यांचा जनसंपर्क आणि मेहनती स्वभाव सर्वश्रुत होता. पवार कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो."(Ajit Pawar Plane Crash)