Ajit Pawar Baramati Political Hold : बारामतीवर असलेली दादांची घट्ट राजकीय पकड

28 Jan 2026 20:05:41
Ajit Pawar Baramati Political Hold
 
मुंबई : (Ajit Pawar Baramati Political Hold) बारामती आणि अजितदादा पवार हे एक वेगळच नाते होते. तब्बल तीन दशके त्यांनी बारामतीवर घट्ट राजकीय वर्चस्व ठेवले होते.अजितदादा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले आहे.१९९१ साली अजितदादा पवार पहिल्यांदा बारामती लोकसभेवर निवडून आले होते.पण शरद पवार यांच्या साठी त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला आणि त्यानंतर बारामती विधानसभेवर आजपर्यंत सलग निवडून येण्याची किमया त्यांनी केली होती.नुकत्याच झालेल्या बारामती नगरपरिषद निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदासह ४१ पैकी ३५ जागांवर विजय मिळवला होता.(Ajit Pawar Baramati Political Hold) यातील ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.यांसह बारामती मधील महत्वाचे कारखाने आणि सहकारी संस्था या अजित पवार यांच्या ताब्यात होत्या.यामध्ये माळेगांव कारखाना,कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा समावेश आहे. विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षिणक कामात सुद्धा अजित पवार यांचा सक्रिय सहभाग असायचा.(Ajit Pawar Baramati Political Hold)
 
 
Powered By Sangraha 9.0