प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला विमान अपघाताचा घटनाक्रम! अजितदादांच्या मृतदेहाची ओळख कशी पटली?

28 Jan 2026 14:37:38

मुंबई, दि. २८ : बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याने त्यांच्यासह ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्यात दु:खद वातावरण आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला, याबाबत प्रत्यक्षदर्शींनी काही माहिती दिली आहे.

घटनास्थळावरील एका प्रत्यक्षदर्शी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, "पहिल्यांदा विमान वरून गेले तेव्हा चांगलेच होते. त्यानंतर ८.४५ वाजता विमान खाली आले आणि मोठा स्फोट झाला. विमान धावपट्टीवर गेलेच नाही, फिरून खालीच कोसळले. आम्ही घरातून पाणी घेऊन आलो आणि आग विझवली. त्यांचे अर्धे शरीर बाजूला पडलेले होते. आणि त्यांचे मुंडकेही पडले होते. त्यानंतर आम्ही कापड गुंडाळायला दिले आणि ती बॉडी नेण्यात आली."

घड्याळानेच पटली ओळख

हा अपघात इतका भीषण होता की, संपूर्ण विमान जळून खाक झाले होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातावर असलेले घड्याळ आणि जॅकेटमुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटल्याची माहिती पुढे आली आहे.
Powered By Sangraha 9.0