Ajit Pawar Plane Crash : "हा निव्वळ अपघात, यात कोणीही राजकारण आणू नये", अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर

28 Jan 2026 20:23:59

ajit pawar

मुंबई : (Ajit Pawar Plane Crash) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी २८ जानेवारीला भीषण विमान अपघातात निधन झाले आहे. अजित पवार हे एका खासगी विमानाने मुंबईवरून बारामतीला येत होते. यावेळी विमानाचं लँडिंग होत असताना विमानाचा अपघात झाला आणि या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे. "हा निव्वळ अपघात असून यात कोणीही राजकारण आणू नये", असे शरद पवार यांनी म्हटले आहे. (Ajit Pawar Plane Crash)

शरद पवार काय म्हणाले?

"अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे, अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला आहे. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही, पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात."(Ajit Pawar Plane Crash)
"मी आज मीडियासमोर येणार नव्हतो, पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली असे कळले. पण यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला आणि आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया यात राजकारण आणू नये, एवढंच सांगायचं आहे", असे शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.(Ajit Pawar Plane Crash)
 
 
Powered By Sangraha 9.0