Ajit Pawar Plane Crash: बारामती विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक आणि कॅप्टन सुमीत कपूर कोण?

28 Jan 2026 15:42:03
Ajit Pawar
 
मुंबई : ( Ajit Pawar Plane Crash ) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख असलेल्या अजित पवार यांच्या विमानाचा बुधवार दि. २८ जानेवारी रोजी भीषण अपघात झाला ज्यात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानात उपस्थित पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, बॉडीगार्ड विदीप जाधव, केबिन क्रू पिंकी माळी आणि विमानाची कमान सांभाळणाऱ्या अनुभवी फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक आणि कॅप्टन सुमीत कपूर यांचाही समावेश आहे.
 
शांभवी पाठक यांनी मुंबई विद्यापीठातून एविएशनचं शिक्षण घेतले होते. यानंतर २०१८ ते २०१९ मध्ये त्यांनी न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक पायलट अकादमीत ट्रेनिंग ही घेतले होते. कॅप्टन सुमीत कपूर यांच्याकडे ही १६ वर्ष विमान उड्डाणाचा अनुभव होता. शिवाय अपघातग्रस्त विमान हे VSR वेंचर्सच लेयरजेट 45 (Learjet 45) होते. त्याचे रजिस्ट्रेशन VT-SSK झाले होते. विमानाचे एकूण वजन हे 9752 किलोग्रॅम होते.
 
हेही वाचा : प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला विमान अपघाताचा घटनाक्रम! अजितदादांच्या मृतदेहाची ओळख कशी पटली?
 
अपघात नेमका झाला कसा?
 
जिल्हा परिषद आणि पंचायती निवडणुकीसाठी अजित पवारांची आज बारामतीत सभा होणार होती. याच सभेसाठी अजित पवार मुंबईहून बारामतीला रवाना झाले होते. मात्र लँडिंग दरम्यान विमानात टेक्निकल बिघाड झाला आणि हे विमान थेट शेजारच्या शेतात जाऊन कोसळले. जमिनीवर कोसळताच या विमानाचा स्फोट झाला, क्षणातच विमानाने पेट घेतला.
 
Powered By Sangraha 9.0