Ajit Pawar Plane Crash: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन...

28 Jan 2026 16:19:55


 Ajit Pawar Plane Crash 
मुंबई: (Ajit Pawar Plane Crash) बारामती विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विमानात उपस्थित इतर चार जणांच्या अकाळी निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना फोन केला होता. यावेळी दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली, असल्याची माहिती माध्यमांवरून मिळत आहे. (Ajit Pawar Plane Crash)
 
हेही वाचा : Ajit Pawar Plane Crash: बारामती विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक आणि कॅप्टन सुमीत कपूर कोण?

 
पंतप्रधानांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये काय? (Ajit Pawar Plane Crash)


श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती. (Ajit Pawar Plane Crash)



Powered By Sangraha 9.0