Ajit Pawar Plane Crash : कसा घडला अपघात?

28 Jan 2026 10:48:58
Ajit Pawar
 
मुंबई : ( Ajit Pawar ) राज्याचे उपमुख्यमंत्री आणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख असलेल्या अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान हा अपघात झाला आहे. विमानात त्यांच्यासोबत असलेले त्यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि विमान कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. 
 
जिल्हा परिषद आणी पंचायती निवडणुकीसाठी अजित पवारांची आज बारामतीत सभा होणार होती. याच सभेसाठी अजित पवार आज मुंबईहून बारामतीस रवाना झाले होते. अजित पवार हे त्यांच्या खासगी चार्टर्ड विमानाने प्रवास करत होते. लँडिंग दरम्यान विमान धावपट्टीवरून घसरल्याने हा अपघात झाला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या अपघातात पाच जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
 
या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीकडे रवाना झाले असुन पवारांचे कुटुंबीय ही त्यांच्या मुंबईतील त्यांच्या राहत्या निवासस्थानावरुन रवाना झाले आहेत. 
 
Powered By Sangraha 9.0