Dr. Mohanji Bhagwat : सर्वांनी मिळून भारताला जगातील 'शिरोमणी राष्ट्र' बनवायचे आहे

27 Jan 2026 13:44:50
Dr. Mohanji Bhagwat
 
मुंबई : (Dr. Mohanji Bhagwat) "आपल्या पूर्वजांनी अपार त्याग करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. आता आपण सर्वांनी मिळून देशाला गणराज्य म्हणून टिकवून ठेवायचे आहे आणि जगातील शिरोमणी राष्ट्र म्हणून देखील बनवायचे आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत (Dr. Mohanji Bhagwat) यांनी केले. ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संस्कृती उत्थान समितीच्या वतीने मधुकर निकेतन, मुझफ्फरपूर, बिहार येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.(Dr. Mohanji Bhagwat)
 
उपस्थितांना संबोधत सरसंघचालक (Dr. Mohanji Bhagwat) म्हणाले, राष्ट्रध्वजाच्या सर्वात वरती त्याग, कर्मशीलता आणि भारताच्या सनातन संस्कृतीचे प्रतीक असलेला भगवा रंग आहे. मधल्या ठिकाणी मनाच्या निर्मळतेचे प्रतीक असलेला पांढरा रंग आहे. लोक कर्मशील राहावेत, उन्नती व प्रगती होत राहावी, लक्ष्मीचे आगमन व्हावे, याचे प्रतीक असलेला हिरवा रंग खालील बासूस आहे.(Dr. Mohanji Bhagwat)
 
हेही वाचा : Bhiklya Dhinda : तारपाच्या श्वासातून वारली संस्कृती जिवंत ठेवणाऱ्या भिकल्या धिंडा यांना 'पद्मश्री' 
 
पुढे ते (Dr. Mohanji Bhagwat) म्हणाले, आपला धर्म काय आहे याचे मार्गदर्शन करणारे आपले संविधान आहे. संविधानाची प्रस्तावना सतत वाचल्याने नागरिक कर्तव्यांची जाणीव होत राहते आणि कायद्याचे पालन करणे हेच नागरिकांचे कर्तव्य आहे. आपल्या देशात काही परंपरेने चालत आलेले नियम-कायदेही आहेत, ज्यांचा कुठे लिखित उल्लेख नसला तरी भारतीय संस्कृती व परंपरांनुसार माणसामध्ये माणुसकी टिकून राहावी यासाठी अशा प्रथा आजही चालत आलेल्या आहेत. आपण सर्वांनी मिळून देशाला जगातील शिरोमणी राष्ट्र बनवायचे आहे. त्यासाठी आपले आदर्श आचरण सातत्याने प्रकट करत राहावे.(Dr. Mohanji Bhagwat)
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0