Padma Shri Girishji Prabhune : ‘समरसता गुरुकुलम’ला महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार; पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांचा शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी गौरव

27 Jan 2026 19:01:28
Padma Shri Girishji Prabhune
 
मुंबई : (Padma Shri Girishji Prabhune) पद्मश्री गिरीशजी प्रभुणे (Padma Shri Girishji Prabhune) यांच्या ‘समरसता गुरुकुलम’ संस्थेला मध्यप्रदेश शासनाच्या वतीने रुपयांचे १० लाखांचे महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. हा पुरस्कार मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या हस्ते, राज्यपाल मंगूभाई पटेल यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.(Padma Shri Girishji Prabhune)
 
संस्थेने समाजातील विविध घटकांमध्ये समरसता निर्माण करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आणि मूल्याधिष्ठित शिक्षण प्रसारित करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना पद्मश्री गिरीशजी प्रभुणे (Padma Shri Girishji Prabhune) यांच्यासह संस्थेच्या प्रधान आचार्य पूनम ताई गुजर उपस्थित होत्या.(Padma Shri Girishji Prabhune)
 
हेही वाचा : ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल 
 
‘समरसता गुरुकुलम’ संस्था दीर्घकाळापासून शैक्षणिक कार्यक्रम, संस्काराधिष्ठित शिक्षण आणि सामाजिक समरसता वाढवण्यासाठी काम करत आहे. राष्ट्रीय पातळीवरील हा सन्मान संस्थेच्या कार्याची पोच आणि प्रभाव अधोरेखित करणारा ठरला आहे.(Padma Shri Girishji Prabhune)
 
या पुरस्कारामुळे संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांना अधिक बळ मिळेल आणि समाजात समन्वय, सद्भावना तसेच राष्ट्रनिर्मितीच्या मूल्यांना चालना मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.(Padma Shri Girishji Prabhune)
 
 
Powered By Sangraha 9.0