मुंबई : (India EU FTA Trade Deal) नवी दिल्ली येथे पार पडलेल्या १६व्या भारत - युरोपीय संघ शिखर परिषदेत भारत आणि युरोपियन संघ यांच्यातील मुक्त व्यापार कराराची (India EU FTA Trade Deal) अधिकृत घोषणा मंगळवारी २७ जानेवारीला करण्यात आली आहे. तब्बल १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर 'मदर ऑफ ऑल डील्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कराराला मंजुरी मिळाली असून त्यावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. भारत आणि युरोपियन संघ यांच्यातील हा करार म्हणजे 'सर्व करारांची जननी' असल्याचे भाष्य पंतप्रधान मोदींनी केले आहे.(India EU FTA Trade Deal)
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
मुक्त व्यापार करारावर भाष्य करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत–युरोपीय संघ व्यापार करारामुळे देशातील उत्पादन, सेवा आणि संबंधित क्षेत्रांचा व्यापक विकास होईल. ‘सर्व करारांची जननी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुक्त व्यापार करारामुळे जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास अधिक दृढ होईल”, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.(India EU FTA Trade Deal)
त्यांनी पुढे सांगितले की हा करार जागतिक पुरवठा साखळी मजबूत करण्यास महत्त्वपूर्ण ठरेल. “कापड, रत्न, दागिने यांसह विविध भारतीय उद्योग क्षेत्रांना याचा मोठा लाभ मिळेल. जगातील दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमधील समन्वयाचे हे उत्तम उदाहरण आहे. हा करार जागतिक जीडीपीच्या अंदाजे २५ टक्के आणि जागतिक व्यापाराच्या जवळपास एक तृतीयांश प्रतिनिधित्व करतो,” असे मोदी म्हणाले.(India EU FTA Trade Deal)
भारत आणि युरोपीय संघामध्ये २००७ पासून मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू होती. तब्बल १८ वर्षांनंतर अखेर या कराराला मंजुरी मिळाली आहे. युरोपीय संघाच्या वतीने युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन डर लेयेन आणि युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो लुईस सँटोस दा कोस्टा यांच्या उपस्थितीत या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले.(India EU FTA Trade Deal)