Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरने ८८ तासांत पाकचं कंबरडं मोडलं, घाबरून केली युद्धबंदीची विनंती! परदेशी अहवालात खुलासा

27 Jan 2026 11:29:12
 

Operation Sindoor
 
 
मुंबई : (Operation Sindoor Swiss think tank Report) स्वित्झर्लंडमधील स्विस लष्करी थिंक टँक 'सेंटर फॉर मिलिटरी हिस्ट्री अँड पर्स्पेक्टिव्ह स्टडीज'ने (CHPM) ४७ पानांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. ७ ते १० मे २०२५ पर्यंत चाललेल्या ८८ तासांच्या संघर्षादरम्यान, भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले आणि तळ उद्ध्वस्त केले.
 
राफेल आणि मिराज-2000 विमानांचा वापर करून, हवाई दलाने बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद मुख्यालय आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाला लक्ष्य केले होते. पाकिस्तानची PL-15 क्षेपणास्त्रे आणि ९०० हून अधिक ड्रोन असूनही, भारताच्या S-400 आणि हवाई संरक्षण दलाने बहुतेक हल्ले हाणून पाडले.
 
अखेर, प्रत्युत्तर देण्याची क्षमता गमावल्यानंतर पाकिस्तानने १० मे रोजी दुपारपर्यंत युद्धबंदीची (Ceasefire) विनंती केली, जी भारताने मान्य केली, असाही दावा स्विस अहवालात केला गेला आहे. ‘Operation Sindoor: The India-Pakistan Air War (7–10 May 2025)’ या नावाने हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. हा भारताबाहेर तयार केलेला सर्वात तपशीलवार अहवाल मानला जातो.

Powered By Sangraha 9.0