Ghatkopar Nityanand Nagar : प्रजासत्ताक दिनी धर्मांधांचा तिरंगा रॅलीला विरोध

27 Jan 2026 18:15:31
Ghatkopar Nityanand Nagar
 
मुंबई : (Ghatkopar Nityanand Nagar) संपूर्ण देश ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना घाटकोपर (Ghatkopar Nityanand Nagar) येथे एक धक्कादायक घटना घडल्याचे निदर्शनास आले. घाटकोपर (Ghatkopar Nityanand Nagar) पश्चिमेतील नित्यानंद नगर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीदरम्यान दोन गटांमध्ये वाद झाला. ही घटना दुपारी सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. लहान मुले 'वंदे मातरम्' आणि 'भारत माता की जय' अशा घोषणा देत तिरंगा रॅली काढत असताना हा प्रकार घडला. एका धर्मांधाने मुलांना देशभक्तीपर घोषणा देण्यापासून रोखले आणि पुढे जाऊन घोषणा देण्यास सांगितले. ही बाब मुलांनी आपल्या पालकांना सांगितल्यानंतर आसिफ आणि मुलांच्या पालकांमध्ये वाद झाला.(Ghatkopar Nityanand Nagar)
 
मुलांचे पालक आणि स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, अजीज शेख आणि त्याच्या साथीदारांनी 'वंदे मातरम्', 'भारत माता की जय' अशा देशभक्तीपर घोषणा आणि तिरंगा रॅलीला विरोध केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूने आरिज आणि त्यांची शेजारीण फातिमा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी कधीही देशभक्तीच्या घोषणा किंवा तिरंग्याचा विरोध केला नसून केवळ आवाजाबाबत गैरसमज झाला, जो विनाकारण मोठा करण्यात आला, असे त्यांचे म्हणणे आहे.(Ghatkopar Nityanand Nagar)
 
मिळालेल्या एफआयआर कॉपीनुसार, तक्रारदार महिलेने तिच्या पतीसह अजीज शेख याच्याकडे जाऊन 'मुलांना का ओरडले' याबाबत विचारले असता; अजीज शेख व त्याच्या मुलांनी तसेच काही अज्ञातांनी तक्रारदार महिलेच्या पतीस लाकडी बांबूने मारल्याचे समोर आले. त्याचदरम्यान त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही निदर्शनास आले आहे.(Ghatkopar Nityanand Nagar)
 
हेही वाचा : Dr. Mohanji Bhagwat : सर्वांनी मिळून भारताला जगातील 'शिरोमणी राष्ट्र' बनवायचे आहे  
 
घटनेनंतर पोलिसांनी सुरुवातीला हा एकाच मोहल्ल्यातील वाद असल्याचे सांगत परस्पर समझोत्याचा सल्ला दिला आणि तक्रार नोंदवण्यास नकार दिला होता. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या आणि भाजप कार्यकर्ते घाटकोपर पोलीस ठाण्यात पोहोचले आणि कारवाईची मागणी केली. किरीट सोमय्या यांच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी अखेर तक्रार दाखल केली.(Ghatkopar Nityanand Nagar)
 
तक्रारदार संध्या समरजीत गुहा यांच्या तक्रारीवरून अजीज शेख, अब्दुल्ला शेख, गौस मोहम्मद शेख, रिजवान शेख आणि अन्य दोन ते तीन व्यक्तींविरुद्ध घाटकोपर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये कलम ११८(१), १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), १९१(३), १९७(१), ३५२, ३५१(२) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.(Ghatkopar Nityanand Nagar)
 
नित्यानंद नगरात हिंदूविरोधी किंवा राष्ट्रविरोधी घटना पूर्वीपासून वारंवार घडत आल्या आहे. या परिसरातून हिंदूंनी निघून जावे, अशी काही धर्मांध मुस्लिमांची इच्छा आहे. त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने हे लोक हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात.(Ghatkopar Nityanand Nagar) झुंडीच्या झुंडीने एकत्र येऊन हिंदूंना त्रास देण्याचा, हिंदूंच्या सणांना गालबोट लावण्याचा प्रकार धर्मांध करतात. काही वर्षांपूर्वी एका हिंदू स्थानिक युवकाची हत्या झाल्याचे प्रकरणही याठिकाणी घडले होते. त्यामुळे येथील हिंदूंना योग्य न्याय मिळायलाच हवा! (Ghatkopar Nityanand Nagar)
 
 
Powered By Sangraha 9.0