मुंबई: (Menopause Clinic) महिलांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवत, राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. या अभिनव उपक्रमाला राज्यभरातील महिलांकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असून महिलांनी समाधान आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. (Menopause Clinic)
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, "मेनोपॉज म्हणजे महिलांच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि संवेदनशील टप्पा असून या काळात होणारे शारीरिक बदल, मानसिक ताण, हॉर्मोनल असंतुलन, हाडांचे आजार, झोपेचे विकार व नैराश्य याकडे आजवर दुर्लक्ष होत होते. हीच गरज ओळखून शासनाने महिलांसाठी ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला, मानसिक आरोग्य समुपदेशन, हाडे, हृदय व हॉर्मोन तपासणी, औषधोपचार आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे." (Menopause Clinic)
हेही वाचा : Gold Line: मुंबई-नवी मुंबई विमानतळांदरम्यान प्रवास जलद; गोल्ड लाईनला मंत्रिमंडळाची मंजुरी
मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे महाराष्ट्र देशात पहिले राज्य
देशात प्रथमच अशा प्रकारचे मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. महिलांच्या आरोग्याबाबत महाराष्ट्राने घेतलेले हे पाऊल इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. मकरसंक्रांतीनिमित्त महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून, खऱ्या अर्थाने महिलांच्या आरोग्याची गोड भेट दिली, अशी भावना महिलांकडून व्यक्त होत आहे. (Menopause Clinic)