"पाकिस्तान आणि दहशतवाद हे कधीही...", UN मध्ये पाकिस्तानविरोधात भारताची ठाम भूमिका

27 Jan 2026 17:54:57
India slams Pakistan at UN

मुंबई : (India slams Pakistan at UN) भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार शब्दांत टीका करत ऑपरेशन सिंदूर बाबत पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. 'पाकिस्तानने नेहमीच विनाकारण कुरापती काढल्या असून, भारत आणि भारतीय जनतेला नुकसान पोहोचवणे हाच त्याचा एकमेव अजेंडा राहिला आहे', अशा कठोर शब्दांत भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावले. (India slams Pakistan at UN)

हेही वाचा - UGC Regulation 2026 : "कोणताही भेदभाव केला जाणार नाही", यूजीसी वादावर केंद्र सरकारनं सोडलं मौन
संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांच्या वक्तव्याला उत्तर देताना स्पष्ट केलं की, "भारताच्या अंतर्गत बाबींवर विशेषतः जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशावर भाष्य करण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही." तसेच संयुक्त राष्ट्रासारखे पवित्र व्यासपीठ दहशतवादाच्या समर्थनासाठी वापरता येणार नाही, असा भारताचा सडेतोड संदेश दिला.  (India slams Pakistan at UN)

'न्यू नॉर्मल'ला ठाम नकार
 
पाकिस्तानच्या दहशतवादी संबंधांवर ते पुढे म्हणाले की, "पाकिस्तान आणि दहशतवाद हे कधीही वेगळे होऊ शकत नाहीत. पाकिस्तानच्या प्रतिनिधींकडून आम्ही 'न्यू नॉर्मल बद्दल ऐकले आहे; मात्र मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, पाकिस्तान जसा प्रयत्न करतो तसा दहशतवाद कधीही सामान्य ठरू शकत नाही. पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवादाचा वापर होत असल्याचं अधोरेखित करत, भारत हे सहन करणार नाही आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ते सर्व पावलं उचलणार", असेही त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. (India slams Pakistan at UN)

Powered By Sangraha 9.0