Gold and Silver Price Surge : सोने-चांदीच्या दरात विक्रमी वाढ! आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी उलथापालथ

27 Jan 2026 18:05:39
Gold and Silver Price Surge 
 
मुंबई : (Gold and Silver Price Surge) मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ (Gold and Silver Price Surge) होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या एका वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत ५,००० डॉलर्सवर पोहोचली असून, चांदीची किंमत १०८ डॉलर्सच्या पुढे गेली आहे.(Gold and Silver Price Surge)
 
या दरवाढीमुळे जागतिक पातळीवर सोन्याचा बाजारभाव ३५ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला आहे, तर चांदीचा बाजारभाव ६ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे.(Gold and Silver Price Surge)
 
हेही वाचा : "पाकिस्तान आणि दहशतवाद हे कधीही...", UN मध्ये पाकिस्तानविरोधात भारताची ठाम भूमिका
 
सोन्याचा बाजार भाव भारताच्या GDP पेक्षा सुमारे आठ पट अधिक आहे. केवळ जानेवारी महिन्यातच सोन्याच्या किमतीत १८ टक्के, तर चांदीच्या किमतीत ५१ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.(Gold and Silver Price Surge) देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम २.५० लाख रुपयांच्या पुढे गेली असून, एक किलो चांदीची किंमत ३.५० लाख रुपयांवर पोहोचली आहे.(Gold and Silver Price Surge)
 
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या करवाढीच्या वैधतेवर अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार आहे, तर फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांवर निर्णय अपेक्षित आहे. याच पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.(Gold and Silver Price Surge)
 
 
Powered By Sangraha 9.0