कळंबोली : (DFCCL Engineering Record) पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरअंतर्गत जेएनपीटी–वैतरणा विभागावर डीएफसीसीसीएलने अभियांत्रिकी क्षेत्रात (DFCCL Engineering Record) एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. नवी मुंबई विभागात कळंबोली येथे ११०.५ मीटर लांबीचा आणि सुमारे १,५०० टन वजनाचा रेल्वे फ्लायओव्हर गर्डर यशस्वीपणे प्रक्षेपित करत डीएफसीसीसीएलने (DFCCL Engineering Record) आपल्या आजवरच्या सर्वांत लांब गर्डरच्या उभारणीचा विक्रम केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर साध्य झालेली ही कामगिरी राष्ट्रनिर्मितीतील अभियंत्यांच्या योगदानाचे जिवंत प्रतीक ठरली आहे.(DFCCL Engineering Record)
या भव्य ओपन वेब स्टील गर्डरचे प्रक्षेपण हे केवळ आकारमानामुळेच नव्हे, तर त्यामागील नियोजन, अचूकता आणि समन्वयामुळे अत्यंत आव्हानात्मक होते. भारतीय रेल्वेच्या धावत्या मार्गावरून तब्बल ३२ मीटरपर्यंत गर्डरला रेडियल पद्धतीने हलवण्याची प्रक्रिया अत्यंत काटेकोर नियोजन आणि सतत निरीक्षणाखाली पार पाडण्यात आली. हा प्रकल्प (DFCCL Engineering Record) भारतात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्याच्या वाढत्या क्षमतेचे द्योतक आहे. आधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी मनुष्यबळ आणि सखोल अभियांत्रिकी कौशल्य यांच्या जोरावर डीएफसीसीएलने (DFCCL Engineering Record) देशाच्या लॉजिस्टिक पायाभूत संरचनेला जागतिक दर्जावर नेण्याच्या दिशेने ठोस पावले टाकत आहे.(DFCCL Engineering Record)
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सामान्य प्रशासन गतिमानतेला यश
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार डीएफसीसीएलच्या कॉर्पोरेट कार्यालयातील वरिष्ठ अधिकारीही होते. कार्यकारी संचालक (प्रकल्प) संदीप श्रीवास्तव आणि सल्लागार (प्रकल्प विकास) एस. के. नेगी यांनी प्रत्यक्ष स्थळी उपस्थित राहून प्रकल्प पथकाच्या तांत्रिक कौशल्याचे, समर्पणाचे आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीचे कौतुक केले.(DFCCL Engineering Record)
जेएनपीटी-वैतरणा विभाग हा पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरमधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. हा विभाग कार्यान्वित झाल्यानंतर देशाच्या अंतर्भागातील उद्योगक्षेत्र आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यांच्यातील मालवाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि कार्यक्षम होणार आहे. यामुळे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला गती मिळून भारताची जागतिक व्यापारातील स्पर्धात्मकता अधिक बळकट होईल.(DFCCL Engineering Record)