India EU Trade Deal : ‘मदर ऑफ ऑल डील्स’चे मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्वागत

27 Jan 2026 20:56:59
India EU Trade Deal
 
मुंबई : (India EU Trade Deal) भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात झालेल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराने (India EU Trade Deal) जागतिक व्यापाराच्या नकाशावर नवा अध्याय लिहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मदर ऑफ ऑल डील्स’ (India EU Trade Deal) या कराराचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा करार भारताच्या जागतिक आर्थिक वाटचालीतील मैलाचा दगड मानला जात आहे. या करारामुळे महाराष्ट्रातील कापड अभियांत्रिकी आणि औषध निर्मितीला मोठी संधी असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.(India EU Trade Deal)
 
२७ युरोपीय देशांचा समावेश असलेल्या युरोपियन युनियनचा जागतिक जीडीपीमधील (India EU Trade Deal) वाटा सुमारे २५ टक्के आहे. या करारामुळे भारताला या प्रचंड बाजारपेठेशी थेट आणि सुलभ व्यापाराची सुवर्णसंधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, भारतीय निर्यातीतील तब्बल ९९ टक्क्यांहून अधिक वस्तूंना युरोपियन बाजारात प्राधान्यपूर्ण प्रवेश मिळणार असून सुमारे ₹६.४१ लाख कोटींच्या निर्यातीला वेग मिळण्याची शक्यता आहे.(India EU Trade Deal)
 
हेही वाचा : Bandra Skywalk Inauguration : वांद्रे (पूर्व) येथील नवीन स्काय वॉकचे लोकार्पण 
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले की, या कराराचा सर्वाधिक फायदा श्रमप्रधान क्षेत्रांना होणार आहे. वस्त्रोद्योग, कातडी उद्योग, सागरी उत्पादने, रत्ने व दागिने यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठी झेप अपेक्षित आहे. यासोबतच कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या निर्यातीसाठीही युरोपियन बाजार खुले होणार असल्याने शेतकरी, कृषी मूल्यसाखळी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. या करारातील फ्युचर-रेडी मोबिलिटी फ्रेमवर्क मुळे कुशल व अर्धकुशल भारतीय मनुष्यबळासाठी जागतिक संधींचे नवे दरवाजे उघडले जाणार असून, भारताची जागतिक अर्थव्यवस्थेतील भूमिका अधिक मजबूत होणार आहे.(India EU Trade Deal)
 
या ऐतिहासिक कराराचा महाराष्ट्राला विशेष लाभ होणार आहे. वस्त्र व परिधान उद्योग, अभियांत्रिकी वस्तू, औषधनिर्माण, रसायने, वैद्यकीय उपकरणे, वाहन व ऑटो घटक, मूलभूत धातू, इलेक्ट्रॉनिक्स तसेच रत्ने व दागिने या क्षेत्रांमध्ये वेगवान वाढ, वाढलेली स्पर्धात्मकता आणि जागतिक बाजारपेठेपर्यंत व्यापक प्रवेश मिळणार आहे. यासोबतच राज्यातील शेतकरी वर्गालाही मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.(India EU Trade Deal)
 
 
Powered By Sangraha 9.0