भंडारा : (Anjali Bharti) भंडारा जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान गायिका अंजली भारती यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. (Anjali Bharti)
हेही वाचा : 77th Republic Day : सहपालकमंत्री आशिष जैस्वाल यांच्या हस्ते गडचिरोलीत राष्ट्रध्वजवंदन
या प्रकरणावर भाजप नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अंजली भारती यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करताना म्हटले आहे की, “राजकीय मतभेद असू शकतात, विरोध असू शकतो. पण कोणाच्या कुटुंबीयांबाबत, विशेषतः महिलांबाबत अशा प्रकारची चिथावणीखोर आणि खालच्या पातळीवर जाणारी भाषा वापरणे पूर्णपणे चुकीचे आहे. अंजली भारतीच्या बुद्धीची कीव करावी तितकी कमी आहे.” (Anjali Bharti)