Mumbai Metro Expansion : मुंबई ते नवी मुंबई विमानतळ ३५ किलोमीटरची नवी मार्गिका

27 Jan 2026 21:01:36
Mumbai Metro Expansion
 
मुंबई : (Mumbai Metro Expansion) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान मेट्रो मार्गिका ८ च्या ३५ किलोमीटरच्या (Mumbai Metro Expansion) जोडणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासोबतच ६६ किलोमीटर लांबीचा नाशिक शहर परिक्रमा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यास आणि गडचिरोली जिल्ह्यात खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोर ते सुरजागड या चार पदरी सिमेंट काँक्रिट महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता देण्यात आली.(Mumbai Metro Expansion)
 
राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे महत्त्वाचे निर्णय मंगळवार,दि. २७ जानेवारी रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत घेण्यात आले.(Mumbai Metro Expansion) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून रस्ते, मेट्रो, महामार्ग आणि औद्योगिक वाहतूक प्रकल्पांना वेग देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. मुंबईकरांसाठी महत्वाच्या मुंबई मेट्रो लाईन ८ (CSMT ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.(Mumbai Metro Expansion)
 
या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल गायकवाड, महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते.(Mumbai Metro Expansion)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गिकेला मान्यता देण्यात आली आहे.(Mumbai Metro Expansion) ही ३५ किलोमीटर लांबीची मार्गिका असून त्यापैकी ९ किलोमीटर भूमिगत तर उर्वरित एलिव्हेटेड असेल. कुर्लासारख्या महत्त्वाच्या स्थानकांना ही मेट्रो जोडली जाईल. ही मेट्रो मार्गिका तीन वेगवेगळ्या मेट्रो मार्गांशी  जोडली जाणार असून,(Mumbai Metro Expansion) मोठ्या प्रमाणातील प्रवासी वाहतूक सुलभ होणार आहे. अंदाजे १८ हजार कोटी रुपये बजेटचा हा प्रकल्प पीपीपी (सार्वजनिक-खासगी भागीदारी) तत्वावर उभारला जाणार आहे.”(Mumbai Metro Expansion)
 
हेही वाचा : India EU Trade Deal : ‘मदर ऑफ ऑल डील्स’चे मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्वागत  
 
खर्च, भूसंपादन आणि तांत्रिक आराखडा
 
एकूण लांबी : ३५ किमी
 
भूमिगत मार्ग : ९ किमी
 
उन्नत (एलिव्हेटेड) मार्ग : उर्वरित भाग
 
सरासरी स्थानक अंतर : १.९ किमी
 
आवश्यक भूसंपादन : ३०.७ हेक्टर
 
भूसंपादन खर्च : ३८८ कोटी रुपये
 
एकूण अपेक्षित प्रकल्प खर्च : २२,८६२ कोटी रुपये
 
इतर महत्वपूर्ण निर्णय
 
गडचिरोलीतील खनिज वाहतुकीसाठी नवा चारपदरी महामार्ग
 
गडचिरोली जिल्ह्यातील औद्योगिक आणि खनिज वाहतूक सुलभ करण्यासाठी नवेगाव मोरे-कोनसरी-मूळचेरा-हेदरी-सुरजागड या ८५.७६ किमी लांबीच्या सुधारित चारपदरी सिमेंट काँक्रिट महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. हा महामार्ग जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.(Mumbai Metro Expansion)
 
समृद्धी महामार्गाचा विस्तार : विदर्भ-गडचिरोलीला विकासाचा नवा दुवा
 
राज्याचा महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग आता गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांपर्यंत विस्तारित होणार आहे. या विस्तारामुळे विदर्भातील दुर्गम आणि आदिवासी भाग मुख्य प्रवाहातील विकासाशी जोडला जाणार असून, उद्योग, शेती, खनिज वाहतूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विस्ताराच्या कामाला तातडीने गती देण्याचे आदेश दिले असून, यामुळे विदर्भाचा आर्थिक नकाशाच बदलण्याची क्षमता या प्रकल्पात आहे.(Mumbai Metro Expansion)
 
नाशिक शहर परिक्रमा मार्ग : कुंभमेळ्याच्या तयारीला वेग
 
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हा मार्ग नाशिक शहरातील वाहतूक कोंडी कमी करणार असून, भाविक आणि नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.(Mumbai Metro Expansion)
एकूण लांबी : ६६.१५ किमी
प्रकल्प खर्च : ३,९५४ कोटी रुपये
 
 
Powered By Sangraha 9.0