Moradabad Burqa Case : मुस्लिम युवतींनी हिंदू विद्यार्थिनीला जबरदस्तीने बुरखा घालण्यास भाग पाडले

25 Jan 2026 16:39:00
Moradabad Burqa Case
 
मुंबई : (Moradabad Burqa Case) उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये (Moradabad Burqa Case) पाच मुस्लिम मुलींनी एका हिंदू विद्यार्थिनीला जबरदस्तीने बुरखा (Moradabad Burqa Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच, हे प्रकरण उजेडात आले. याप्रकरणी पोलिसांनी युवतीच्या भावाच्या तक्रारीनुसार रितसर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.(Moradabad Burqa Case)
 
मिळालेल्या माहितीनुसार, हिंदू युवती तिच्या मुस्लिम मैत्रिणींबरोबर बिलारी शहरातील एका खाजगी क्लासला जात असे. (Moradabad Burqa Case) त्यावेळी क्लासमधून बाहेर पडल्यानंतर एका मोहल्ल्यात आल्यानंतर तिला तिच्या पाच मुस्लिम मैत्रिणींनी सांगितले की तू इस्लाम स्वीकार कर यामुळे तुझे नशीब बदलेल.(Moradabad Burqa Case) या बुरख्यात तू खूप सुंदर दिसशील, असे म्हणून त्यांनी बॅगमधून बुरखा काढून तिला घातला.(Moradabad Burqa Case)
 
पीडितेच्या भावाने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याची बहिण आणि आरोपी मुली एकाच शाळेत बारावी इयत्तेत शिकतात. (Moradabad Burqa Case) सर्वांचे वय साधारण सतरा वर्षांचे आहे. त्या एकत्र खाजगी क्लासला देखील जातात. आरोपी मुलींनी माझ्या बहिणीचे ब्रेनवॉश करण्यास सुरुवात केली. पाचही जणी तिला वारंवार इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करत असत.(Moradabad Burqa Case)
 
हेही वाचा : ‘कैसा हराया’ ते ‘कैसी माफी मांगी’; पण हा शेवट नाही...! 
 
घटनेमागे नक्कीच काहीतरी खोलवर कट
 
पिडितेच्या भावाने सांगितले की, या संपूर्ण घटनेमागे नक्कीच काहीतरी खोलवर कट आहे. एखादी इस्लामिक संघटना विद्यार्थिनींना पुढे करून हिंदू अल्पवयीन मुलींना फसवून धर्मांतराची मोहीम चालवत आहे, ज्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे.”(Moradabad Burqa Case)
 
घटनेमुळे हिंदू संघटनांमध्येही संताप
 
या घटनेमुळे हिंदू संघटनांमध्येही संताप आहे. अनेक हिंदू संघटनांनी यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे, जेणेकरून शाळांना धर्मांतराच्या छायेपासून दूर ठेवता येईल.(Moradabad Burqa Case)
 
Powered By Sangraha 9.0