‘कैसा हराया’ ते ‘कैसी माफी मांगी’; पण हा शेवट नाही...!

25 Jan 2026 13:58:16
Sahar Yunus Sheikh
 
‘कैसा हराया’ म्हणणार्‍या सहर किंवा तिच्या पित्याला युनूस शेखला सत्तेची स्वप्ने दाखवणारे जन्माने हिंदू; पण कर्माने गैरहिंदू वाटणारा जितेंद्र आव्हाडच होते. युनूसच्या म्हणण्याप्रमाणे ’जेजे’ म्हणजे ‘झुटा जितेंद्र’ युनूसचा जिगरीदोस्त होता. ‘तुतारी’ला ‘मुतारी’ वगैरे वगैरे बोलत युनूस शेखने, त्याच्या मुलीला जिंकवले. (आव्हाड किंवा तुतारी नेत्यांबद्दल अजिबात सहानुभूती नाही) पुढे, सहरच्या वादग्रस्त विधानामुळे गदारोळ उठला. आता तिच्या नेत्याने इम्तियाज जलीलने म्हटले आहे की, मुंब्राच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातच हिरवा रंग पसरवणार. सहरने माफी मागून सगळे संपले का? याचा घेतलेला मागोवा...
 
अल्लहमदुल्लीलाह येणार्‍या पाच वर्षांत पूर्ण मुंब्रा हिरवा करून दाखवू,” असे म्हणणार्‍या, ‘एमआयएम’ नगरसेविका सहर युनूस शेखने शेवटी माफी मागितली आहे. तिचे म्हणणे तिला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. ती असेही म्हणाली की, "मुंब्रा हिरव्या रंगाने रंगवणे म्हणजे ती तिच्या झेंड्याचा रंग म्हणाली. जर तिचा झेंडा भगव्या रंगाचा असता, तरी ती म्हणाली असती की, मुंब्रा भगवा करून दाखवू.” सहरच्या विधानावरून गेले काही दिवस गदारोळ उठला आहे; पण सहर जे म्हणाली यात नवीन काय आहे? तिच्या विधानाचा अर्थ तर फक्त ‘गजवा-ए-मुंब्रा’ व्हावा, असाच काढला जातो. सत्य तर हे आहे की, इथे गल्लीत पंक्चर काढणार्‍या छोटछोट्या बालकांनाही हे स्वप्न पडते आहे. इस्लाम वाढवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद काय वाट्टेल तो मार्ग अवलंबायचा, हेच सर्वांचे काम आहे, अशी मानसिकता असणारेही आहेतच. सहर त्यापासून वेगळी कशी असेल? एक मुस्लीम म्हणून तिला जे संस्कार दिले गेलेत, ती त्याला जागणारच. तिच्या मानसिकतेचा विचार केला तर एक ठाम दिसते की, एक कट्टर मुस्लीम म्हणून तिची जडणघडण करण्यात तिचे माता-पिता, तिचा समाज यशस्वी झाला. नव्हे... नव्हे, जगभरातले मुस्लीम पालक यामध्ये यशस्वीच असतात. का? याचा विचार गांभीर्याने होणे आवश्यक आहे. तर सहरच्या भाषणातून तिला मिळालेले संस्कार अगदी भरभरून वाहत होते. ‘कैसा हराया’ म्हणत असतानाचा तिचा आनंद तर केवळ अवर्णनीयच. पण, सहर हे जे म्हणाली, ते काय केवळ सहरचे एकटीचे म्हणणे असेल का? तिच्या माफीने काय साध्य होणार? कारण ‘एमआयएम’ पक्षाच्या इम्तियाज जलीलने म्हटले आहे की, फक्त मुंब्राच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवणार आहे.
 
या सहर प्रकरणावरून एवढेच वाटते की, आता निवडणुकीमध्ये हजारो हिंदू नगरसेवकपदी निवडून आले आहेत. जिंकल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय हेाती? त्यांच्यापैकी एकानेही म्हटलेले आढळले का की, ‘येत्या पाच वर्षांत हा अमुक-अमुक भाग मी भगवा करेन.’ आता यावर काही लोक म्हणतील, हिंदू सहिष्णू आहेत, ते धर्मांध नाहीत. इथपर्यंत ठीकच आहे की, हिंदू सहिष्णू आहेत वगैरे. पण, पैजेवार आपण म्हणू शकतो, यातील आपलेच असे हजारो नगरसेवक असतील, जे सत्तेत आल्या-आल्या गणित मांडतील की, आपल्याला मुस्लिमांची मते मिळाली नाहीत. पाच वर्षांत ते कसे आपल्याकडे येतील, याचे प्रयत्न करायचे. त्यासाठी हिंदूंकडे दुर्लक्ष झाले तरी चालेल, हिंदूंचे काय ते तर आपलेच आहेत, असे मानणारे बहुसंख्य हिंदू नगरसेवक आहेतच. हिंदू-मुस्लीम भेद करायचा नाही; पण सहर ही पहिल्यांदा नगरसेविका झालेली मुस्लीम तरुणी आहे. तिला मुंब्रा हिरवा करणार हे बोलण्याचे धाडस आणि कळकळ आहे. (या विधानामुळे भाजप नेता किरीट सोमय्या यांनी तिच्याबद्दल तक्रार केली होती). पण, या पार्श्वभूमीवर वर्षानुवर्षे नगरसेविका असणार्‍या किंवा त्यांचे पती किंवा वडील, भाऊ पक्षात नेते आहेत, अशा किती हिंदू नगरसेविका बेधडकपणे म्हणू शकतात की, "मी माझ्या वॉर्डात ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’ आणि त्याद्वारे होणारा ‘व्होट जिहाद’ निर्माण होऊनच देणार नाही!” अर्थात, अशी तळमळ असणार्‍या खूपच कमी असतील.
 
सहर ज्या मुंब्र्याबद्दल बोलली, त्या मुंब्र्याचे वास्तव जगजाहीर आहे. "लोकशाही शरियाविरोधात आहे. ‘गजवा-ए-हिंद’ झालेच पाहिजे,” असे म्हणत, मुस्लीम तरुणांना फितवणार्‍या पुण्याच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर जुबैर हंगरगेकर याला ‘एटीएस’ने काही महिन्यांपूर्वी पकडले. त्याच्या चौकशीत तो म्हणाला की, त्याची बैठक मुंब्र्याच्या इम्रान आबिदीच्या घरी झाली होती. इम्रान हा मुंब्र्याला राहायचा आणि कुर्ल्याला एका मशिदीमध्ये मुलांना शिकवायला जायचा. पुढे इम्रानलाही पोलिसांनी पकडले. तसे पाहायला गेले, तर मुंब्रा-कौसा परिसरातून गेल्या अनेक वर्षांत ‘सिमी’, ‘लष्करए तोयबा‘, ‘हिझबुल मुझाहिद्दीन’, ‘इसिस’ अशा विविध अतिरेकी संघटनांचे हस्तक ‘एनआयए’, ‘एटीएस’ गुन्हे शाखेने गजाआड केले आहेत. दहशतवादी कारवाईमध्ये सहभागी असलेल्या लोकांचा उद्देश होता, तो म्हणजे ‘भारत देश हिंदू काफिरांचा आहे, म्हणजे गैरमुस्लिमांचा आहे. इथे शरियाचे राज्य आले पाहिजे. देशविघातक कृत्य कशासाठी तर भारतात गैरमुस्लीम हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून. त्याच मुंब्र्यामध्ये ‘एमआयएम’ला बहुमत मिळणे, हा योगायोग आहे असे म्हणावे का? तसेही, देशभराचा मागोवा घेतल्यास ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ आणि ‘ड्रग्ज जिहाद’च्या माध्यमातून, हिंदू लोकवस्तीला चिरडून तिथे कौमवाल्यांना वसवायचे, हे अनेक वर्षांपासून चालले आहे. उत्तर प्रदेशच्या बलरामपूरचा छांगूरबाबा हे याचे उत्तम उदाहरण. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून ‘व्होट जिहाद’ही सुरू झाला. दक्षिण मुंबई आणि उत्तर-पूर्व मुंबईत मुस्लिमबहुल भागातून, भाजप-महायुतीविरोधात एकगठ्ठा मतदान झाल्याचे उघडकीस आले. आता नगरसेवक निवडणुकीमध्येही तोच पॅटर्न आहे. त्यामुळेच सहरच काय, मुंबईत ‘एमआयएम’च्या ज्या आठ जागा निवडून येण्यामागे हेच कारण आहे.
 
स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुस्लीम राजकीयदृष्ट्या जागृतच आहेत. स्वतंत्र भारतात हिंदू बहुसंख्य होते. एकत्र राहिलो तर पंतप्रधान आणि इतर सत्तेची पदे हिंदूंनाच भूषवता येतील, असे तत्कालीन मुस्लिमांना वाटले. त्यामुळेच पाकिस्तानची मागणी झाली हे सत्य आहे; पण पाकिस्तान निर्माण झाला, आता भारतात गुण्यागोविंदाने मिळून-मिसळून राहू, असे इथल्या सगळ्याच लोकांना वाटते का? आम्ही जिथे राहतो, तिथेही वरचढच राहणार आणि सगळ्या परिसरावर कब्जा करणार, असे मत त्यांचे नसते का? त्यामुळे सहरने माफी मागितली आहे पण, तिला जे सांगायचे होते, ते तिचे व्यवस्थित सांगून झाले.
 
ती ज्या पक्षाची नगरसेवक आहे, तो तोच पक्ष आहे; ज्या पक्षाने म्यानमार देशाच्या रोहिंग्यांसाठी मुंबईत शहीदस्तंभाला लाथा मारल्या होत्या, महिला पोलिसाचा विनयभंग केला होता, मुंबई वेठीस धरली होती. तो तोच पक्ष आहे, ज्यांच्या नेत्याने ओवेसीने म्हटले होते की, फक्त १५ मिनिटे पोलीस हटवा, मग आम्ही काय करतो ते बघा... आम्ही काहीही करू शकतो आणि हिंदू तर आमच्यासमोर अजिबात टिकूच शकत नाहीत, ही मानसिकता. या पार्श्वभूमीवर धर्मांधतेला वाव असणारे विधान करणार्‍या सहरला माफी मागावी लागली आहे.
 
असो, जागतिक घडामोडी पाहिल्या, तर जगभरात यामुळेच ‘इस्लामफोबिया’ निर्माण झाला आहे. जगाचे सोडा, आपल्या मुंबईतही मालवणी, भायखळा, विक्रोळी, गोवंडी, मानखुर्द, जोगेश्वरी, वांद्रे वगैरे परिसरात अनेक वॉर्ड अचानक मुस्लिमबहुल झालेले दिसतात, याचे कारण काय आहे? काही भ्रष्ट प्रशासक आणि सर्वकाही डोळ्यादेखत घडत असतानाही दुर्लक्ष करणारे काही भ्रष्ट पोलीस, निवडणुकीत मतांसाठी कामाला येतील म्हणत, अवैधरित्या वसणार्‍यांना मदत करणारे ते काही नेते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बाजूला दहशतवादी जरी राहायला आला, तरी जोपर्यंत माझ्या घरात काही परिणाम होत नाही ना, मग मला काय करायचे? असे मानसिकता असलेले हिंदू. हेच याला जबाबदार आहेत. ‘कैसा हराया’ ते ‘कैसी माफी मांगी’ इथपर्यंतचा प्रवास हा हिंदू एकतेचा आहे पण, तरीही निवडणुकीच्या आयामात हा प्रवास उपयोगाचा आहे का? राजकीयदृष्ट्या सजग असणार्‍या कौमपुढे, मीठ-पिठामध्ये एक-दोन रुपायांची वाढ झाली म्हणून मतदान न करणार्‍या हिंदूंचे अस्तित्व भविष्यात काय असेल, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
 
मुंब्र्यांचा रंग तर केव्हाच बदलला आहे...
 
१९८०च्या दशकापर्यंत आगरी-कोळ्यांचे गाव असलेले मुंब्रा. १९९१ मध्ये इथली लोकसंख्या सुमारे ४४ हजार होती. १९९२च्या दंगलीनंतर अनेक मुस्लीम, मुंबई सोडून मुंब्रा येथे स्थायिक झाले. मुस्लिमांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने ‘राज्य वक्फ बोर्डा’च्या ताब्यात, दहा चौरस मैल जमीन दिली. आज याच मुंब्र्यात आगरी-कोळी समाज नावाला आढळतो, तर मुस्लिमांची संख्या पाच लाख झाली आहे. हा भारतातील सर्वात मोठा मुस्लीम परिसर आहे, जो भारतातील सर्वात मोठी मुस्लीम वस्ती म्हणून ओळखला जातो.
Powered By Sangraha 9.0