Republic Day : प्रजासत्ताक दिनाचा खरा अर्थ सांगणारी संविधान गौरव यात्रा
लोकशाही टिकवायची असेल तर संविधान समजले पाहिजे; हाच संदेश घेऊन सांताक्रुझ पूर्वेतील संविधान गौरव यात्रा गेली सोळा वर्षे जनजागृतीचे कार्य करत आहे.
25-Jan-2026
Total Views |
मुंबई : (Republic Day) वाकोला–कलिना परिसरात प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) निमित्ताने दरवर्षी संविधानाचा जागर घडवणारी एक वेगळीच चळवळ अनुभवास येते. ढोलताशांच्या गजरात आणि संविधानिक मूल्यांचा जयघोष करत निघणारी संविधान गौरव यात्रा ही या परिसराची लोकशाही ओळख बनली आहे.भारतीय संविधान केवळ कायद्यांचा संच नसून सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य यांचा जिवंत दस्तऐवज आहे.(Republic Day) हेच संविधानाचे मोल सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावे, लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी आणि संविधानाचा जागर व्हावा, या उद्देशाने सम्राट अशोका सामाजिक प्रतिष्ठान संलग्न संविधान गौरव समिती, सांताक्रुझ (पूर्व) विभागाच्या वतीने गेल्या सोळा वर्षांपासून सातत्याने संविधान गौरव यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.(Republic Day)
या यात्रेदरम्यान वाकोला पोलीस ठाणे येथे छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून संविधानिक विचारधारेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. त्यानंतर यात्रा पुढील मार्गावर मार्गस्थ होत संविधानाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवत पुढे सरकली.(Republic Day)
प्रजासत्ताक दिन (Republic Day) हा केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरता मर्यादित न राहता त्यामागील संविधानिक अर्थ लोकांपर्यंत पोहोचावा, या व्यापक दृष्टीकोनातून हा उपक्रम राबविण्यात येतो. यात्रेदरम्यान विविध ठिकाणी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात येते.(Republic Day) तसेच वक्त्यांच्या माध्यमातून संविधान निर्मितीची प्रक्रिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ऐतिहासिक योगदान आणि भारताच्या लोकशाही परंपरेचा अमूल्य वारसा नागरिकांसमोर मांडण्यात येतो.(Republic Day)
या यात्रेत दरवर्षी पाचशे ते हजार नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध समाजघटकांचा सहभाग या यात्रेला सामाजिक समरसतेचे स्वरूप देतो. मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांकडून यात्रेचे स्वागत करण्यात येत असून, संविधानाबद्दलची आपुलकी आणि आदरभाव यातून प्रकर्षाने दिसून येतो.(Republic Day)
याच उपक्रमाअंतर्गत भारतीय संविधान अंमलबजावणी गौरव दिनानिमित्त सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजता संविधान गौरव मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मिरवणूक सुमेध बुद्ध विहार, अशोक नगर येथून प्रारंभ होऊन वाकोला ब्रिज, वाकोला पोलीस ठाणे, वाकोला मशिद, सेंट अँथोनी मार्ग, सी. डी. उमाचेन चौक, कालीना मार्केट, सेंट मेरी चौक, बोधिवृक्ष बुद्ध विहार, इंडियन एअरलाईन्स कॉलनी मार्गे कालीना येथे सांगता होणार आहे.(Republic Day)
या संपूर्ण उपक्रमाचे नेतृत्व अध्यक्ष लक्ष्मण गावडे, मुख्य सरचिटणीस राजेश भोसले, खजिनदार विजय सकपाळ तसेच प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असून, वाकोला–कलिना परिसरात संविधानिक मूल्यांचा जागर घडविणारा हा उपक्रम नागरिकांच्या सहभागामुळे अधिक व्यापक स्वरूप धारण करत आहे. संविधान गौरव यात्रा ही केवळ मिरवणूक न राहता लोकशाहीची जाणीव जागवणारी चळवळ ठरत असून, भारतीय संविधानाचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या माध्यमातून सातत्याने सुरू आहे.(Republic Day)
नागरिकांनी आजचा प्रजासत्ताक दिवस (Republic Day) फक्त औपचारिक कार्यक्रम किंवा पूजा-अर्चापुरताच मर्यादित न ठेवता या दिवशी समाज घटकांपर्यंत लोकशाही मूल्ये, संविधानिक अधिकार आणि सामाजिक न्याय पोहोचवणे हा मुख्य उद्देश आहे. असे उपक्रम समाजात जागर, सहभाग आणि प्रेरणा निर्माण करणारे आणि अनुकरणीय ठरतील.(Republic Day)