मुंबई : ( Amartya Sen ) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांची ' विशोष सखोल फेरतपासणी मोहीम ( एसआयआर ) घाईघाईत राबवली जात आहे. ज्यामुळे लोकशाहीला धोका उद्भवू शकतो, असा इशारा अर्थतज्ञ व नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी दिला आहे.
अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी बोस्टन येथून त्यांचे मत व्यक्त करताना असे म्हणाले की, मतदार यादीतील सुधारणा प्रक्रिया ही अत्यंत काळजीपूर्वक आणि पुरेशा वेळेनिशी होणे आवश्यक आहे. परंतु बंगालमध्ये याचा अभाव आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी पुरेशी वेळ दिला जात नाही, हे अन्यायकारक आहे, तसेच एसआयआर दरम्यान वेळेचा दबाव निवडणूक अधिकाऱ्यांवर स्पष्टपणे जाणवत असल्याचेही अमर्त्य सेन यांनी नमूद केले.
हेही वाचा : लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांचा प्रश्न एका कॉलवर सुटणार; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा
एसआयआर प्रक्रियेत मतदार यादीतील डुप्लिकेट नावे, मृत व्यक्तींची नावे वगळणे तसेच नवीन पात्र मतदारांची नावे यादीत समाविष्ट करणे यांचा समावेश असतो. मात्र त्यांनी आता ही प्रक्रिया घाईघाईने राबवली जात असल्याने यामुळे लोकशाही व्यवस्थेलाच धक्का बसण्याची भीती व्यक्त केली आहे.