Kirit Somaiya : हिंदूंना चिथावणी देणाऱ्या सहर शेखच्या अखेर "माफीनामा"

24 Jan 2026 16:49:15
Kirit Somaiya

ठाणे : (Kirit Somaiya) ठाणे महानगरपालिका निवडणुकीनंतर निवडून आलेल्या मुंब्रा येथील एमआयएम पक्षाचा महिला नगरसेविका सहर शेख यांनी मुंब्रा येथे चिथावणी देणारे भाषण केले होते, यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुंब्रा पोलीस स्टेशन येथे भेट देत "हम मुंब्रा को हरा बना देंगे" असे चिथावणी भाषण देणाऱ्या शेखच्या विरोधात कारवाई करावी असे निवेदन दिले होते.(Kirit Somaiya) यामुळे शनिवारी पुन्हा मुंब्रा पोलीस स्टेशन येथे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भेट दिली असता चिथावणी भाषण केलेल्या सहर शेख हिने जाहीर माफी मागितली असे पत्रक पोलिसांनी सोमय्या याना दिले.(Kirit Somaiya)
 
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिम पक्षाचा सहर शेखनी हिंदुना चिथावणी देणाऱ्या "हम मुंब्रा को हरा बना देंगे" असे व्यक्तव्य केले होते, यामुळे तात्काळ भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुंब्रा पोलीस स्टेशन येथे भेट देत ठाणे महानगरपालिका निवडणुकीनंतर एआयएमआयएम पक्षाचे नेते मुंब्रा येथे भडकाऊ, चिथावणी देणारे भाषण देऊ लागले आहेत, यामुळे मुंब्रा येथील कमी संख्येमध्ये राहणाऱ्या हिंदूंमध्ये भीती पसरवण्याकरिता अशी भाषणे केली जात आहेत, असे निवेदन भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुंब्रा पोलीस स्टेशन येथे दिले होते. याच बरोबर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांनी देखील निवेदन दिले होते. यामुळे पोलिसांनी मुंब्रा येथील सहार युनूस शेख राहणार तन्वर नगर, कौसा, मुंब्रा हिच्याकडे पुन्हा चौकशी केली असता, तिने दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी माफीनामा लिहून दिला आहे. या माफीनाम्यात तिने लिहिले आहे कि, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी तन्वर नाका, मुंब्रा येथे झालेल्या सभेत तिने "हम मुंब्रा को हरा बना देंगे" असे भाषण केले होते, सदरचे वाक्य त्या त्यांच्या पार्टीच्या झेंडा व निशाणीच्या संदर्भात बोलल्या होत्या, तिचे कुणाचेही मन दुखावण्याचा किंवा वातावरण खराब करण्याचा हेतू नव्हता, आम्ही " तिरंगा साठी जगू आणि तिरंगा साठीच मरू" तरी तिच्या व्यक्तव्यामुळे कुणाचेही मन दुखावले असेल तर मी जाहीर पने माफी मागते असे लेखी जबाब सहर शेख हिने पोलिसांना लिहून दिला आहे. यामुळे पुन्हा असे घडले तर शेख वर कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आली असल्याचे देखील पोलिसांनी भाजप नेते किरीट सोमय्या याना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.(Kirit Somaiya)
 
हेही वाचा : Borivali Signal Upgradation : पश्चिम रेल्वेच्या बोरिवलीत नवे सिग्नलिंग युग 
 
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा सहर शेखनी हिंदुना चिथावणी देणाऱ्या "हम मुंब्रा को हरा बना देंगे" ह्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे, मुंब्रा पोलिसांनी माझ्या तक्रारी नंतर सहर शेखला नोटीस पाठवली होती.(Kirit Somaiya) मी आज पाठपुराव्यासाठी मुंब्रा पोलिस स्टेशनला गेलो, त्यावेळी ही माहिती मला लिखित स्वरूपात पोलिसांनी दिली.(Kirit Somaiya)
किरीट सोमैया, भाजप नेते.
 
 
Powered By Sangraha 9.0