ठाणे : (BJP Corporators Felicitation) भारतीय जनता पार्टीच्या (BJP Corporators Felicitation) शिवाईनगर-वसंत विहार मंडळाच्या वतीने भाजपाच्या मंडळातील पाच नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.(BJP Corporators Felicitation) तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. मंडळ अध्यक्ष राकेश मालोजी चौगुले यांच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.(BJP Corporators Felicitation)
भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या विभागीय कार्यालयात हा कार्यक्रम झाला.(BJP Corporators Felicitation)
कोणत्याही निवडणुकीत पक्षाला विजय मिळविण्यासाठी संघटनात्मक बांधणी महत्त्वाची असते.(BJP Corporators Felicitation) शिवाईनगर-वसंत विहार मंडलाचे अध्यक्ष राकेश चौगुले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनबद्ध पक्षकार्य आणि नागरिकांबरोबर संपर्क ठेवला. त्यामुळे महायुतीच्या मंडलातील सर्व जागांवर विजय मिळविता आला, याबद्दल आमदार केळकर, आमदार डावखरे आणि जिल्हाध्यक्ष लेले यांनी कौतुक केले.(BJP Corporators Felicitation)
माजी उपमहापौर व प्रभाग क्र. ४ मधील नवनिर्वाचित नगरसेवक मुकेश मोकाशी, आशादेवी सिंह, स्नेहा आंब्रे यांनी पुन्हा विजय मिळविला. तर प्रभाग क्र. ५ मधून सिताराम राणे व प्रभाग क्र. ७ मधून वैभव कदम यांची प्रथमच नगरसेवकपदी निवड झाली.(BJP Corporators Felicitation) या सर्व नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला. या नगरसेवकांनी विजयाचे श्रेय भाजपाचे कार्यकर्ते व सामान्य मतदारांना दिले.(BJP Corporators Felicitation)
या निवडणुकीतील संयोजक किरण धतुरे व राजेश सावंत आणि अनुसुचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. ताराचंद पवार यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला (BJP Corporators Felicitation) भाजपाचे मंडलातील कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.(BJP Corporators Felicitation)