Mumbai Metro : मेट्रो लाईन ७ए साठी मोठे यश, अपर वैतरणा जलवाहिनी यशस्वीरीत्या वळवली

24 Jan 2026 17:17:30
Mumbai Metro
 
मुंबई : (Mumbai Metro) मुंबई मेट्रो (Mumbai Metro) लाईन ७ए प्रकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आव्हानात्मक टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला असून, २४०० मिमी क्षमतेच्या अपर वैतरणा जलवाहिनीचे सुरक्षित व अचूक वळविणे पूर्ण करण्यात आले आहे.(Mumbai Metro) या टप्प्यामुळे मेट्रो मार्गिकेच्या कामातील मोठा अडथळा दूर झाला असून प्रकल्प नियोजित वेळेत पूर्णत्वाकडे नेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.(Mumbai Metro)
 
या कामादरम्यान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत सातत्यपूर्ण समन्वय राखत सूक्ष्म नियोजन आणि उच्च दर्जाच्या अभियांत्रिकी कौशल्याच्या आधारे हे गुंतागुंतीचे काम पार पाडले. महानगरपालिकेच्या नियोजन विभागासह आऊटसाईड सिटी ट्रंक मेन्स, हायड्रॉलिक इंजिनिअर कार्यालय आणि K/East वॉर्ड अशा विविध विभागांच्या संयुक्त समन्वयातून हा महत्त्वाचा टप्पा यशस्वी करण्यात आला.(Mumbai Metro)
 
हेही वाचा : डीएफसीसी प्रकल्पासाठी कळंबोली–पनवेल दरम्यान विशेष ब्लॉक्स; रेल्वे वाहतुकीवर तात्पुरता परिणाम  
 
निश्चित करण्यात आलेल्या अल्प कालावधीतील शटडाऊनमध्ये जलवाहिनी स्थलांतराचे काम वेळेत पूर्ण करून तात्काळ जलपुरवठा पूर्ववत करण्यात आला.(Mumbai Metro) त्यामुळे नागरिकांना कमीत कमी गैरसोय झाली. या यशस्वी टप्प्यामुळे मेट्रो लाईन ७ए प्रकल्पाच्या कामाला वेग मिळणार असून, मुंबईकरांना अधिक जलद, सुरक्षित आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.(Mumbai Metro)
 
 
Powered By Sangraha 9.0