ST : 'एसटी संगे तीर्थाटन’ योजनेचा शुभारंभ,

23 Jan 2026 19:51:00

मुंबई : (ST) सर्वसामान्य नागरिकांच्या श्रद्धा, सुरक्षितता आणि परवडणारा प्रवास या तीनही बाबी केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) (ST) एक महत्त्वाची लोकहितकारी योजना सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार आणि स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १००व्या जयंतीनिमित्त ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी (ST) संगे तीर्थाटन’ ही योजना राज्यभर राबविण्यात येत आहे.(ST)
 
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने धार्मिक पर्यटनाची संधी उपलब्ध करून देणे. परिवहन मंत्री व एसटी (ST) महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, ही योजना “स्वस्त आणि सुरक्षित” या तत्त्वावर आधारित असून, श्रद्धास्थळांपर्यंतचा प्रवास सुलभ करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.(ST)
 
हेही वाचा : Narendra Modi: रेल्वे संपर्क मजबूत झाला की विकासालाही गती: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार 
 
या योजनेअंतर्गत राज्य शासनाने एसटी प्रवासासाठी दिलेल्या सर्व सामाजिक सवलती लागू राहणार आहेत.(ST) महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. प्रत्येक आगारातून ४० प्रवाशांचे गट तयार करून, नव्या व सुरक्षित बसेसमधून सहली आयोजित केल्या जाणार आहेत.(ST) दि.२३ जानेवारी २०२६ पासून ही योजना राज्यातील २५१ आगारांत एकाच वेळी सुरू होणार असून, दररोज सुमारे १,००० ते १,२५० विशेष धार्मिक व पर्यटन बसगाड्या धावणार आहेत.(ST)
 
अष्टविनायक, पंढरपूर, तुळजापूर, शिर्डी, शेगाव, गणपतीपुळे यांसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश या सहलीमध्ये असेल. ही योजना केवळ धार्मिक पर्यटनापुरती मर्यादित नसून, ती सामाजिक समावेश, सुरक्षित प्रवास आणि सर्वसामान्यांच्या हिताची ठोस पावले उचलणारी आहे. लाखो भाविकांसाठी ही योजना श्रद्धेचा आणि विश्वासाचा प्रवास ठरणार आहे.(ST)
 
Powered By Sangraha 9.0