मुंबई : (Dr. Tejas Lokhande) माघी गणेशोत्सवानिमित्त राज्यभरामध्ये उत्साहाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. गणपती म्हणजे विद्येची देवता. म्हणूनच गणेशोत्सवादरम्यान वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्येचा जागर आपण अनुभवतो. याच पार्श्वभूमीवर चेंबूर येथील डॉ. तेजस लोखंडे (Dr. Tejas Lokhande) यांनी आपल्या निवासस्थानी मोडी लिपीचा देखावा साकार केला आहे. मोडी लिपीच्या संवर्धनासाठी, अभ्यासासाठी, त्यांनी हागळावेगळा देखावा साकार केला असून त्याचे सध्या सगळीकडे कौतुक होत आहे.(Dr. Tejas Lokhande)
डॉ. तेजस लोखंडे (Dr. Tejas Lokhande) यांनी साकारलेल्या या देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे मोडी लिपीच्या उगमापासून ते पत्र व्यवहारांमध्ये असलेल्या त्याच्या वापरापर्यंत अनेक वेगवेगळ्या पत्रकांचे नमुने त्यांनी या देखाव्यामध्ये सादर केले आहे. अकराव्या शतकापासून ते अगदी आंग्लकालीन काळापर्यंत झालेल्या पत्रव्यवहाराच्या नोंदी त्यांनी या देखाव्यामध्ये साकारले आहेत. सुलेखन आणि चित्रकलेच्या अनोख्या संगमातून त्यांनी हा देखावा साकारला आहे. डॉ. तेजस लोखांडे (Dr. Tejas Lokhande) आपल्या 'स्वराज्यकला' या उपक्रमाच्या माध्यमातून मागची अनेक वर्ष मोडी लिपीचे ज्ञानसंचित लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. पेशाने डॉक्टर असणाऱ्या तेजस लोखंडे मागची २ वर्ष आपल्या दवाखान्यातील केस पेपर्स सुद्धा मोडी लिपीमध्ये लिहीत आहेत. एक समाज म्हणून आपणच आपल्या लिपीच्या संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकायाला हवे असे मत त्यांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे.(Dr. Tejas Lokhande)
हेही वाचा : महाराष्ट्रातून सुरू होणारी भारताची आत्मनिर्भरता
मोडी लिपी ही भविष्य घडवणारी विद्या होऊ शकते !
" आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याच अभिजात भाषेसारखी, प्राचीन आणि महत्त्वपूर्ण लिपी म्हणजे मोडी लिपी. आज जर आपल्याला ऐतिहासिक कागदपत्र, दस्तावेज, यांचा अभ्यास करायचा असेल तर मोडी लिपी शिवाय गत्यंतर नाही. मोडी लिपीमुळे आपल्याला इतिहास नव्याने कळेल. (Dr. Tejas Lokhande) प्राचीन ज्ञानाची दालन उघडणारी जर ही विद्या आहे , तर ही भविष्य घडवणारी विद्या सुद्धा होऊ शकते असं मला वाटतं आणि म्हणूनच हा विचार मी लोकांसमोर मांडतो आहे. "(Dr. Tejas Lokhande)
-डॉ. तेजस लोखंडे
मोडी लिपी अभ्यासक