Chhatrapati Shivaji Maharaj Museum : छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहलयातील कला महोत्सवाला उदंड प्रतिसाद

23 Jan 2026 18:25:42
Chhatrapati Shivaji Maharaj Museum
 
मुंबई : (Chhatrapati Shivaji Maharaj Museum) छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (Chhatrapati Shivaji Maharaj Museum) (CSMVS) आणि टेंडर रूट्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने चिल्ड्रन्स म्युझियममध्ये आयोजित करण्यात आलेला ‘रूट फोकवेज्’ बाल सादरीकरण कला महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात बालक, पालक, शिक्षक तसेच कला रसिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.(Chhatrapati Shivaji Maharaj Museum) बालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचा उद्देश विविध पार्श्वभूमीतील मुलांना सादरीकरण कलेच्या माध्यमातून समृद्ध अनुभव देणे तसेच भारताच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाबद्दल जाणीव व संवेदनशीलता निर्माण करणे हा होता. दिवसभर विविध वेळांमध्ये घेण्यात आलेल्या सत्रांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.(Chhatrapati Shivaji Maharaj Museum)
 
या महोत्सवात देशभरातील विविध पारंपरिक आणि लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील मल्लखांब, करन ढोल, तारपा नृत्य, गुजरातची सिद्दी गोमा, राजस्थानचे मंगणियार लोकगायक, कच्छची पावा जोडी, तामिळनाडूतील याझ, तसेच शालेय बँड यांच्या सादरीकरणांचा समावेश होता. प्रत्येक सादरीकरणाने मुलांना विविध प्रादेशिक कला, ताल आणि कथनशैलींचा परिचय करून दिला, ज्यामुळे हा अनुभव मनोरंजक आणि शैक्षणिक ठरला.(Chhatrapati Shivaji Maharaj Museum)
 
हेही वाचा : Dr. Ravin Thatte : पेज टू स्टेज साहित्य मालिकेत पार पडले डॉ. रविन थत्ते यांचे प्रेरणादायी संवाद सत्र 
 
या उपक्रमाविषयी बोलताना CSMVSच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Museum) सहाय्यक संचालिका – प्रदर्शन, शिक्षण व सार्वजनिक कार्यक्रम, वैदेही सावनळ यांनी बालकांसाठी अनुभवाधारित शिक्षणाच्या माध्यमातून जिवंत परंपरांचा परिचय करून देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि संग्रहालय हे एक गतिशील सांस्कृतिक व शैक्षणिक व्यासपीठ असल्याचे नमूद केले.चिल्ड्रन्स म्युझियमच्या स्थापनेनंतर हा सादरीकरण कला महोत्सव दरवर्षी संग्रहालयातच, विशेषतः मुलांसाठी क्युरेट करून आयोजित केला जात आहे.(Chhatrapati Shivaji Maharaj Museum) ‘रूट फोकवेज्’ बाल सादरीकरण कला महोत्सवाने पुढील पिढीसाठी कला, संस्कृती आणि वारसा अधिक सुलभ, सहभागी आणि अर्थपूर्ण बनवण्याच्या CSMVSच्या वचनबद्धतेला पुन्हा एकदा अधोरेखित केले.(Chhatrapati Shivaji Maharaj Museum)
 
 
Powered By Sangraha 9.0