'बॉर्डर २' या चित्रपटात सनी देओलने दिली धर्मेंद्रजींना अनोखी आदरांजली...

23 Jan 2026 20:11:49

Border 2

मुंबई : ( Border 2 ) सनी देओलचा बहुप्रतिक्षित 'बॉर्डर २' आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात आपले घर तयार केले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १o कोटीहून अधिक रूपयांची कमाई केली आहे. परंतु या सगळ्यात एका खास गोष्टींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडचे हि-मॅन धमेंद्र यांचे दु:खद निधन झाले. याच पार्श्वभूमीवर अभिनेता सनी देओल यांनी आपल्या वडिलांना या चित्रपटाच्या माध्यमातून अनोखी आदरांजली अर्पण केली आहे.


'बॉर्डर २' चित्रपटाच्या सुरूवातीला सनी देओल यांच्या नावासोबत त्यांच्या वडिलांचे म्हणजेच धर्मेंद्रजींचे नाव पडद्यावर दिसले. 'सनी देओल (धर्मेंद्र का बेटा) असे नाव पडद्यावर झळकले. सनी देओल यांच्या या अनोख्या आदरांजलीने चाहत्यांचे मन जिंकले आहे. चित्रपटगृहात अनेक प्रेक्षक यामुळे भावुक झालेलेही पाहायला मिळाले.





बॉर्डर २ जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीपूर्वीच, हा महाकाव्य युद्ध अ‍ॅक्शन ड्रामा बॉक्स ऑफिसवर आधीच धमाका करत आहे. 'बॉर्डर २' ही १९९७ च्या युद्ध चित्रपट 'बॉर्डर' चा दुसरा भाग असून, सनी देओल हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात सनी देओल सोबत वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ हे कलाकार देखील आहेत.



 
Powered By Sangraha 9.0