मुंबईकरांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे सरकार आणून त्यांना वंदन केले आहे – नवनाथ बन

23 Jan 2026 18:01:02
Navnath Ban
 
मुंबई : ( Navnath Ban ) "मुंबईकरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार कोण आहेत हे ओळखले आणि या जन्मशताब्दी वर्षानिमीत्त एका बाजूस उबाठा,उध्दव ठाकरे,आदित्य ठाकरे,संजय राऊत यांनी त्यांचे विचार पायदळी तुडवले असताना मुंबईकरांनी मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे सरकार आणून त्यांना वंदन केले आहे.याबद्दल मी तमाम मुंबईकरांच्यावतीने वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करतो.बाळासाहेब ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुत्ववादाची ज्वाला प्रज्वलीत करण्याच काम केल." असे रोखठोक मत भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवार दि.२३ रोजी व्यक्त केले.
 
"राज ठाकरेंनी उध्दव ठाकरेंना प्रचंड मदत केली पण उध्दव ठाकरेनी राज ठाकरेंना अजीबात मदत केलेली दिसत नाही हे आकडेवारी सांगते.राज ठाकरे वयक्तिक फायद्यासाठी कोणतीही भूमिका घेत नाहीत.या आधी लोकसभेला देखील त्यांनी भाजपला पाठींबा दिला होता.आता महानगरपालिकेत सुध्दा त्यांना लक्षात आले की खरा धोका देणारा कोण आहे.म्हणूनच कल्याण डोंबिवलीत राज ठाकरेंनी लवचीक भूमिका घेतली आणि महायुतीला पाठींबा दिला.कमी जागा देऊन उबाठाने राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला राज ठाकरे याचा बदला घेतील अशी मला खात्री आहे."असेही बन यांनी स्पष्ट केले.
 
हेही वाचा : Chandrashekhar Bawankule : अतिउत्साह फार काळ टिकत नाही; सहर शेख यांच्या विधानावर मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया
 
"आदित्य ठाकरेंना दावोस मध्ये जाऊन बांद्र्याबद्दल करार करण्याची गरज नाही आहे.त्या गप्पा करण्यापेक्षा मुंबईत काय अवस्था झाली आहे ते बघा.तूम्ही काय फक्त पर्यटन करण्यासाठी दावोस ला गेला होता का याच उत्तर द्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस मधून ८३ टक्के करारात थेट परकीय गुंतवणूक आणली आहे. यातून ४० लाख रोजगार निर्मीती होणार आहे." असे बन म्हणाले.
 
"बदलापूर मध्ये अतीशय असंवेदनशील घटना घडलेली आहे.दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच सरकार आहे.जो चुकतो त्याच्यावर कडक कारवाई होते.सतेज पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांच कतृत्व माहीत करून घ्याव, मुख्यमंत्री चोवीस तास काम करतात.ते गृहखाते,मुख्यमंत्रीपद सक्षमपणे सांभाळतात.याआधी बदलापूरच्या घटनेत दोषीस शीक्षा देण्याच काम त्यांनी केल आहे." असेही बन यांनी स्पष्ट केले.
 
Powered By Sangraha 9.0