मुंबई : (Chandrashekhar Bawankule) एखादी निवडणूक जिंकल्यावर असलेल्या अतिउत्साहाचे हे प्रतिक असून हा उत्साह फार काळ टिकत नाही, अशी प्रतिक्रिया महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मुंब्रा येथील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या वक्तव्यावर दिली.(Chandrashekhar Bawankule)
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, "निवडून आल्यानंतर अतिउत्साहात अशी विधाने करणे योग्य नाही. हे लोक निवडून आल्यानंतर पाकिस्तानचे ध्वज फडकवतात. आततायीपणा आणि अतिउत्साहीपणाने झेंड्याचा आधार घेऊन सामाजिक आणि धार्मिक वातावरण भडकवणे योग्य नाही."(Chandrashekhar Bawankule)
जि.प. आणि पंचायत समित्यांमध्येही असणार स्विकृत सदस्य
"जिल्हा परिषदेत किमान १० सदस्यांमागे एक आणि पंचायत समितीमध्ये ५ सदस्यांमागे एक असे स्विकृत सदस्य राहावेत. ग्रामविकास आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करावी, अशी विनंती मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केली होती. याबद्दल ग्रामविकास मंत्र्यांशीही चर्चा झाली आहे. महानगरपालिका आणि नगरपालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येसुद्धा स्विकृत सदस्य असावे, ही माझी मागणी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकतेने घेतली आहे. लवकरच हा कायदा मंत्रीमंडळाकडे आणि सभागृहात येईल, अशी अपेक्षा आहे. ग्रामीण भागातील अनेक लोकप्रतिनिधी चांगले काम करत असतानाही आरक्षणामुळे राहून जातात. त्यामुळे त्यांनाही संधी द्यावी, असा प्रस्ताव मी दिला असून यावर सकारात्मक निर्णय होईल," असे ते म्हणाले.(Chandrashekhar Bawankule)
जिल्हा परिषद निवडणूकीत भाजप-शिवसेना युती
"जिल्हा परिषद निवडणूकांसाठी काही ठिकाणी भाजप-शिवसेना युती झाली आहे. काही ठिकाणी युती होऊ शकली नाही. त्यामुळे त्या त्या भागातील नेत्यांनी बसून सकारात्मक चर्चा केली आहे. ज्याठिकाणी युती मान्य आहे तिथे प्रामाणिकपणे युती करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे," असेही मंत्री बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
"अचलपूरमध्ये वेगळी परिस्थिती आहे. तिथे भाजपच्या ९ जागा आहेत. बाकी काँग्रेस, उबाठा, एमआयएमचे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांनी आपापले गट तयार केले आहेत. भाजपच्या गटात कुठलाही एमआयएम किंवा काँग्रेस नाही. त्यांनीच गट तयार करून सभापतीपद वाटून घेतले. भाजपचा काहीही संबंध नसून आम्ही एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही. एमआयएमला आमचा कुठलाही पाठींबा नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.(Chandrashekhar Bawankule)
विरोधकांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करावा
"दावोस हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे केंद्र असून तिथे अनेक देश येतात. तिथून महाराष्ट्राने ३० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली आहे. यामुळे सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी खुल्या मंचावर येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान केला पाहिजे. विरोधक एकीकडे रोजगाराच्या नावाने बोंबा मारतात पण दुसरीकडे, मुख्यमंत्र्यानी एवढे मोठे कर्तृत्व केल्यानंतर त्यांच्यावर टीका करतात. शंका-कुशंका निर्माण करून महाराष्ट्राची पत घालवणे योग्य नाही. मी महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. ही ३० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक खरीखुरी असून ती विकसित महाराष्ट्रासाठी महत्वाची आहे. त्यामुळे विरोधकांनी जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करावा," अशी मागणीही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली.
कल्याण-डोंबिवलीत चर्चेनंतर अंतिम निर्णय
"स्थानिक पातळीवर नगरसेवक कुठल्या ना कुठल्या गटात जातात. कल्याण-डोंबिवलीत शिवसेना आणि मनसेचा काय निर्णय झाला याची कल्पना नाही. तो त्यांचा पक्षाचा अधिकार आहे. पण भाजप-महायुती चर्चा सुरु असून त्यात अंतिम निर्णय होईल," असेही ते म्हणाले.(Chandrashekhar Bawankule)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....