मुंबई : (Simran Bala) केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) इतिहासात येत्या २६ जानेवारी रोजी प्रथमच एक महत्त्वपूर्ण घटना घडणार आहे. जम्मू आणि काश्मीरमधील २६ वर्षीय सहाय्यक कमांडंट सिमरन बाला (Simran Bala) नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनात पूर्णतः पुरुष सीआरपीएफ तुकडीचे नेतृत्व करणार आहेत. प्रजासत्ताक दिन संचलनात सीआरपीएफच्या पुरुष तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी (Simran Bala) ठरणार असून, ही घटना दलासाठी तसेच गणवेशातील महिलांसाठी एक ऐतिहासिक टप्पा मानली जात आहे.(Simran Bala)
मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक कमांडंट सिमरन बाला या १४० हून अधिक पुरुष सीआरपीएफ जवानांच्या तुकडीचे नेतृत्व करतील. राष्ट्रीय स्तरावरील या कार्यक्रमात ही तुकडी शिस्त, व्यावसायिकता आणि भारताच्या सुरक्षा दलांमधील महिलांच्या वाढत्या भूमिकेचे दर्शन घडवेल. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा येथील रहिवासी असलेल्या सिमरन बाला (Simran Bala) यांनी यूपीएससीच्या सहाय्यक कमांडंट परीक्षेत यश मिळवून सीआरपीएफ मध्ये प्रवेश केला. त्यांचा हा सहभाग जम्मू-काश्मीरसाठी अभिमानाचा क्षण मानला जात असून, देशसेवेसाठी सशस्त्र दलात जाण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या तरुणींना प्रेरणा देणारा ठरत आहे.(Simran Bala)
सिमरन (Simran Bala) या जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरच्या सीमावर्ती गावातून येतात, जिथे पाकिस्तानकडून होणाऱ्या विनाकारण गोळीबारामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मोर्टार आणि गोळ्यांच्या सावटाखालीच सिमरन बाला (Simran Bala) यांचे बालपण गेले. सीआरपीएफच्या पुरुष तुकडीचे नेतृत्व करणे हा जितका मोठा सन्मान आहे, तितकीच मोठी ती जबाबदारी असल्याचे सिमरन बाला यांनी सांगितले.(Simran Bala)
सिमरन बाला (Simran Bala) यांनी २०२३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा उत्तीर्ण करून सीआरपीएफ मध्ये प्रवेश केला. या परीक्षेत त्यांनी अखिल भारतीय स्तरावर ८२वी रँक मिळवली होती.त्या वर्षी जम्मू-काश्मीरमधून ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या त्या एकमेव महिला उमेदवार होत्या.(Simran Bala)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक