NHAI and Konkan Railway : रस्ता–रेल्वे समन्वयाला नवी गती

23 Jan 2026 18:56:00
NHAI and Konkan Railway
 
मुंबई : (NHAI and Konkan Railway) देशाच्या पायाभूत विकासाला नवी गती देणाऱ्या एका महत्त्वपूर्ण घडामोडीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (NHAI and Konkan Railway) यांनी पाच वर्षांचा सहकार्य करार केला आहे. नवी दिल्लीतील नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुख्यालयात झालेल्या या सामंजस्य करारामुळे रस्ता आणि रेल्वे या दोन महत्त्वाच्या वाहतूक माध्यमांचा समन्वय अधिक बळकट होणार आहे.(NHAI and Konkan Railway)
 
या करारामागील मुख्य उद्देश म्हणजे संसाधनांचा सर्वोत्तम वापर करत, नियोजनबद्ध आणि एकात्मिक पायाभूत सुविधा उभारणे. महामार्ग विकासातील एनएचएआयचा व्यापक अनुभव आणि अवघड भौगोलिक परिस्थितीत रेल्वे प्रकल्प राबवण्यातील कोकण रेल्वेची तज्ज्ञताया दोन्ही शक्ती एकत्र येणार आहेत.(NHAI and Konkan Railway) डोंगराळ भाग, कठीण भूगर्भरचना आणि पर्यावरणीय आव्हाने असलेल्या प्रदेशांमध्ये हा समन्वय विशेष परिणामकारक ठरणार आहे.(NHAI and Konkan Railway)
 
या भागीदारीतून रेल्वे-कम-रस्ता पूल, बोगदे, मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क, इंटर-मोडल हब्स, महामार्ग-रेल्वे छेदनबिंदूंवरील ग्रेड सेपरेटर्स आणि शक्य तिथे सामायिक युटिलिटी कॉरिडॉर्स यांसारख्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जाणार आहे. कोकण रेल्वेच्या (NHAI and Konkan Railway) अनुभवाचा वापर करून गुंतागुंतीच्या पुलांचे आणि बोगद्यांचे डिझाइन पुनरावलोकन, उतार स्थिरीकरण, तसेच सुरक्षितता आणि गुणवत्ता तपासण्या केल्या जातील.(NHAI and Konkan Railway)
 
हेही वाचा : Chhatrapati Shivaji Maharaj Museum : छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहलयातील कला महोत्सवाला उदंड प्रतिसाद 
 
या करारात केवळ प्रकल्प अंमलबजावणीच नव्हे, तर तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण, प्रकल्प व्यवस्थापनातील उत्तम पद्धती, पर्यावरण व्यवस्थापन, नाविन्यपूर्ण साहित्याचा वापर आणि संशोधन उपक्रम यांचाही समावेश आहे. एनएचएआयच्या अधिकाऱ्यांसाठी कोकण रेल्वेच्या (NHAI and Konkan Railway) प्रशिक्षण केंद्रांत विशेष प्रशिक्षण कार्यक्रमही राबवले जाणार आहेत.(NHAI and Konkan Railway)
 
राष्ट्रीय महामार्ग आणि कोकण रेल्वे (NHAI and Konkan Railway) मार्गालगतच्या वापरात नसलेल्या जमिनींचा व्यावसायिक, लॉजिस्टिक्स आणि इतर पायाभूत प्रकल्पांसाठी उपयोग करण्याची संधीही या सहकार्यामुळे खुली होणार आहे. पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यातील कनेक्टिव्हिटी सुधारणा, मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीचा समन्वय आणि समर्पित फ्रेट लिंक विकसित करणे हेही या कराराचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार असून, पुढील पाच वर्षे हा करार देशाच्या पायाभूत विकासात एक नवा अध्याय लिहिणार आहे.(NHAI and Konkan Railway)
 
 
Powered By Sangraha 9.0