Narendra Modi: बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची मराठीतून भावपूर्ण आदरांजली

23 Jan 2026 14:10:23


 
Narendra Modi
 
मुंबई : (Narendra Modi) हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून खास पोस्ट शेअर करत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे दोन फोटो शेअर केले असून, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा गौरव केला आहे. (Narendra Modi)
 

पंतप्रधान मोदी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे बाळासाहेब ठाकरे हे एक दिग्गज व्यक्तिमत्त्व होते. “तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते,” असे त्यांनी नमूद केले. (Narendra Modi)
 
हेही वाचा :  ​​raj thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची भावनिक आणि परखड पोस्ट! पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाले?


राजकारणाबरोबरच बाळासाहेब ठाकरे यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेची विशेष आवड होती, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण, तसेच विविध विषयांवरील निर्भय आणि परखड भाष्य सातत्याने दिसून येत होते, असे मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. (Narendra Modi)

“महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दूरदृष्टीतून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू,” असे आश्वासन देत पंतप्रधान मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अभिवादन केले आहे. (Narendra Modi)
 

 

Powered By Sangraha 9.0