Betul Farmers Ram Yatra : बैतूलच्या शेतकरी रामभक्तांची ११२१ किमीची पदयात्रा

१३४१ गावांची माती, १०३ नद्यांचे जल रामलल्लांचरणी अर्पण

    23-Jan-2026   
Total Views |
Betul Farmers Ram Yatra 

मुंबई : (Betul Farmers Ram Yatra) मध्यप्रदेशच्या बैतूल (Betul Farmers Ram Yatra) येथील दोन पदयात्री युवकांनी ११२१ किलोमीटरचा प्रवास करत परिसरातील १३४१ गावांची माती आणि १०३ नद्यांचे जल रामलल्लांना अर्पण केले आहे. या पदयात्रींनी मंदिर परिसराची तसेच शरयू नदीची माती मस्तकावर धारण केली आणि ती परिसरात वाटप करण्यासाठीही संकलित केली. हे दोन्ही पदयात्री युवक शेतकरी आहेत.(Betul Farmers Ram Yatra)
 
बैतूल जिल्ह्यातील खेड़ी सावलीगढ़ गावाचे रहिवासी धनंजय सिंह आणि केसो मोरले यांनी सांगितले की, सुमारे दहा वर्षांपूर्वी युवकांचा एक गट ‘रामायण मंडळ’ या नावाने दर आठवड्याला मानसपाठ करत असे. (Betul Farmers Ram Yatra) २०१५ साली हा गट रामजन्मभूमीवर मानस पारायणासाठी अयोध्येला आला होता आणि वेद मंदिरात पाठ केला होता. त्यावेळी आपल्या आराध्य प्रभू रामलल्लांचे दर्शन तंबूत होत असल्याचे पाहून पारायणासाठी आलेल्या सुमारे डझनभर युवकांच्या मनात वेदना निर्माण झाल्या. मंदिर उभारल्यानंतरच पुन्हा दर्शन घेण्याचा त्यांनी संकल्प केला.(Betul Farmers Ram Yatra)
 
हेही वाचा : ​​Raj Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची भावनिक आणि परखड पोस्ट! पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाले? 
 
श्रीराम मंदिरात (Betul Farmers Ram Yatra) रामलल्यांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर धनंजय सिंह आणि केसो मोरले यांनी रामललाच्या दर्शनासाठी जाण्याचे ठरवले. रिकाम्या हाताने जाण्याची परंपरा नसल्याने काय अर्पण करावे, याचा विचार करताना देशातील गावांची चंदनासारखी पवित्र माती आणि परिसरातील नद्यांचे पाणी संकलित करण्याची कल्पना पुढे आली. सुमारे ३०० सहकाऱ्यांच्या मदतीने सूर्यपुत्री तापती, चंद्रपुत्री पूर्णा, बेल, बेतवा, देवना, तवा, काजल, मोरण, बेलगंगा, सुखी नदी, सापना आदी परिसराला जीवन देणाऱ्या लहानृ-मोठ्या १०३ नद्या व उपनद्यांचे पाणी तसेच जिल्ह्यातील १४९० गावांपैकी १३४१ गावांची पवित्र माती गोळा करण्यात आली. या संकलनासाठी सुमारे ५० दिवसांचा कालावधी लागला.(Betul Farmers Ram Yatra)
 
बैतूलच्या (Betul Farmers Ram Yatra) गंज परिसरातील राधाकृष्ण मंदिरात भगवा ध्वजाचे पूजन व आरती करून २७ डिसेंबर रोजी पदयात्रेला सुरुवात झाली. दररोज सरासरी ५० किलोमीटर अंतर पार करत, विविध ३० ठिकाणी मुक्काम करत पदयात्री २० जानेवारी रोजी अयोध्या जिल्ह्यातील ब्रह्मदेव स्थान येथे पोहोचले.(Betul Farmers Ram Yatra) २२ जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रचे महासचिव चंपतराय यांची वेळ मिळाल्यानंतर ते कारसेवकपूरम येथे गेले आणि जल व माती त्यांच्याकडे सुपूर्द केली.(Betul Farmers Ram Yatra)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक