मुंबई : (Ayodhya Shri Ram Temple) अयोध्येतील श्रीराम मंदिरात (Ayodhya Shri Ram Temple) विराजमान रामललाच्या प्राण-प्रतिष्ठेला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक भव्य व ऐतिहासिक भेट म्हणून ‘स्वर्ण कोदंड’ अर्पण करण्यात आला. ओडिशामध्ये तयार करण्यात आलेले २८६ किलो वजनाचे कोदंड (धनुष्य) अयोध्येतील श्रीराम मंदिरात दाखल झाले. हे धनुष्य पंचधातूपासून म्हणजेच सोने, चांदी, तांबे, जस्त आणि लोखंड यापासून बनवण्यात आले आहे.(Ayodhya Shri Ram Temple)
विशेष म्हणजे हे पवित्र धनुष्य तामिळनाडूतील कांचीपूरम येथील महिला कारागिरांनी घडवले आहे. राम मंदिर (Ayodhya Shri Ram Temple) प्राणप्रतिष्ठेच्या तिसऱ्या वर्षाच्या प्रारंभी गुरुवारी हे अद्वितीय धनुष्य राम मंदिर ट्रस्टकडे औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आले. पंचधातूपासून निर्मित या स्वर्ण कोदंडाची लांबी सुमारे ८ फूट आहे.(Ayodhya Shri Ram Temple)
हे धनुष्य सुरुवातीला अयोध्येतील राम मंदिर (Ayodhya Shri Ram Temple) आंदोलनाच्या दरम्यान कारसेवकांना थांबण्यासाठी करण्यात आलेल्या कारसेवकपुरम येथे ठेवण्यात आले होते. ३ जानेवारी २०२६ रोजी ओडिशातील राऊरकेला येथून या कोदंडाची भव्य शोभायात्रा अयोध्येसाठी रवाना झाली होती. या शोभायात्रेचे आयोजन सनातन जागरण मंच यांच्या वतीने करण्यात आले होते.(Ayodhya Shri Ram Temple)
ओडिशातून निघालेली यात्रा ओडिशातील ३० जिल्ह्यांतून प्रवास करत १९ जानेवारी रोजी पुरी येथे भगवान जगन्नाथांचे दर्शन व पूजन करून पुढे मार्गस्थ झाली. २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठेच्या पावन पर्वावर हे स्वर्ण धनुष्य अयोध्येत पोहोचून श्रीराम मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आले.(Ayodhya Shri Ram Temple)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.