मुंबई : (Municipal Corporation) राज्यभरातील २९ महानगरपालिकांच्या (Municipal Corporation) महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर झाली असून बृहन्मुंबईसह बहुतांश प्रमुख महापालिकांमध्ये (Municipal Corporation) यंदा महिलाराज असणार आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील परिषद सभागृहात ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज उपस्थित होते. (Municipal Corporation)
१५ महापालिका महिलांसाठी आरक्षित
महापौरपदाच्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीमुळे अनेक महापालिकांमध्ये (Municipal Corporation) कोणत्या पक्षाचा आणि कोणत्या प्रवर्गाचा महापौर बसणार हे निश्चित झाले असून यामुळे अनेक मोठ्या महापालिकांमध्ये (Municipal Corporation)सत्तेची समीकरणे बदलणार आहेत. दरम्यान, एकूण २९ महानगरपालिकांपैकी (Municipal Corporation) १५ महिलांसाठी आरक्षित आहे तर, उर्वरित १४ महापालिका सर्वसाधारण आहेत.
महापालिकांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे :
अनुसूचित जाती (एससी) - ३ महापालिका
अनुसूचित जमाती (एसटी) - १ महापालिका
इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) - ८ महापालिका
सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) - १७ महापालिका
२९ महानगरपालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण