मुंबई : ( VHP Demands CBI Inquiry in Sabarimala Gold Theft Case ) शबरीमला सोने चोरी प्रकरणामध्ये उच्चस्तरीय कट असल्याचा आरोप करत या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची विहिंपकडून मागणी करण्यात आली. याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी उच्चपदस्थ राजकीय नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. ते केरळ सचिवालयाबाहेर शबरीमला समितीने आयोजित केलेल्या निषेध सभेत बोलत होते.
ते म्हणाले की, हे सर्व चोरीचे जाळे केरळच्या सीमेपलीकडे पसरलेले आहे आणि स्थानिक पोलिसांकडून त्याची निष्पक्षपणे चौकशी केली जाऊ शकत नाही. पवित्र मंदिरातून सोने गायब होणे हा स्थानिक गुन्हा नसून एक व्यापक कट आहे, त्यामुळे खरे गुन्हेगार ओळखण्यासाठी सबरीमाला सोने चोरी प्रकरण सीबीआयकडे सोपवले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, शबरीमाला मंदिराचा मुद्दा केवळ केरळमधील भाविकांनाच नव्हे तर भारतातील संपूर्ण हिंदू समुदायाला प्रभावित करतो. या निषेध आंदोलनात समितीच्या अध्यक्षा केपी शशिकला यांनी अध्यक्षपद भूषवले. व्हीएचपी आणि सबरीमाला समितीने त्यांचे आंदोलन तीव्र केल्याने देवस्वोम प्रशासनावरील नियंत्रण सोडण्यासाठी आणि केंद्रीय एजन्सी चौकशीची मागणी मान्य करण्यासाठी एलडीएफ सरकारवर दबाव वाढत आहे.
समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनीही या कार्यक्रमात भाषण केले आणि मंदिर अधिकाऱ्यांनी मंदिराचे पावित्र्य जाणूनबुजून नष्ट केले आहे. देवस्वोम बोर्ड मंदिरांचे कसे गैरव्यवस्थापन करत आहे याबद्दल आम्हाला असंख्य अहवाल येत आहेत. एसआयटी केरळ पोलिसांनी स्थापन केली आहे, जी निष्काळजीपणाचा आरोप असलेल्या लोकांनाच अहवाल देते. ती सीबीआय किंवा स्वतंत्र एजन्सीकडे सोपवली पाहिजे.
- एसजेआर कुमार, सबरीमाला समिती राष्ट्रीय उपाध्यक्ष
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.