Madras High Court : उदयनिधींचे हिंदूविरोधी वक्तव्य द्वेषपूर्णच; अमित मालवीयांवरील एफआयआर रद्द

22 Jan 2026 17:29:26
Madras High Court
 
मुंबई : (Madras High Court) मद्रास उच्च न्यायालयाच्या (Madras High Court) मदुराई खंडपीठाने २०२३ मध्ये भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द केली. न्यायालयाने (Madras High Court) स्पष्ट केले की डीएमके नेते उदयनिधी स्टालिन यांनी 'सनातन उन्मूलन परिषदेत' केलेले भाषण हे हिंदू समाजाविरोधातील 'द्वेषपूर्ण भाषण' अर्थात हेट स्पीचच आहे. २ सप्टेंबर २०२३ रोजी, तामिळनाडूचे तत्कालीन युवक कल्याण व क्रीडा मंत्री उदयनिधी स्टालिन यांनी ‘सनातन उन्मूलन परिषदेत’ भाषण करताना सनातन धर्माची तुलना डास, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोना यांच्याशी केली आणि तो पूर्णपणे नष्ट केला पाहिजे असे म्हटले होते.(Madras High Court)
 
न्यायमूर्ती एस. श्रीमती यांनी नमूद केले की, गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू धर्मावर सातत्याने हल्ले होत आलेत; सुरुवातीला द्रविड कळघमकडून आणि नंतर द्रविड मुनेत्र कळघमकडून. न्यायमूर्ती एस. श्रीमती यांनी निरीक्षण नोंदवले की तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्री यांच्या हिंदूविरोधी द्वेषपूर्ण भाषणावर प्रतिक्रिया देणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले, मात्र ज्यांनी हे द्वेषपूर्ण भाषण सुरू केले, त्यांच्याविरोधात कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. २०२३ मध्ये तिरुचिरापल्ली पोलिसांनी अमित मालवीय यांच्यावर उदयनिधी स्टालिन यांच्या ‘सनातन धर्म नष्ट करा’ या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केली होती, हे येथे स्मरणात ठेवावे लागेल.(Madras High Court)
 
हेही वाचा : 1984 Anti-Sikh Riots: शीखविरोधी दंगल प्रकरणी माजी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता; तरीही तुरुंगातून सुटका नाहीच 
 
न्यायालयाने (Madras High Court) अमित मालवीय यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादांची दखल घेतली, ज्यात डीएमकेकडून सातत्याने सनातन धर्मावर हल्ले होत असल्याचे अधोरेखित करण्यात आले होते. याचा उल्लेख करत न्यायमूर्ती म्हणाल्या, “द्रविड कळघम आणि त्यानंतर डीएमकेकडून गेल्या १०० वर्षांत हिंदू धर्मावर स्पष्ट हल्ले झाले आहेत आणि संबंधित मंत्री त्याच परंपरेतील आहेत. सर्व परिस्थिती लक्षात घेता, याचिकाकर्त्याने मंत्र्यांच्या भाषणातील लपलेला अर्थ प्रश्नांकित केला आहे.” न्यायालयाने पुढे नमूद केले की उदयनिधी स्टालिन यांची वक्तव्ये द्वेषपूर्ण भाषण ठरतात आणि अमित मालवीय हे सनातनी असल्याने ते पीडित आहेत. त्यांनी केवळ डीएमके नेत्यांच्या मौखिक हल्ल्याविरोधात सनातन धर्माचे समर्थन केले.(Madras High Court)
 
दि. २ सप्टेंबर २०२३ रोजी, तामिळनाडूचे तत्कालीन युवक कल्याण व क्रीडा मंत्री उदयनिधी स्टालिन यांनी ‘सनातन उन्मूलन परिषदेत’ भाषण करताना सनातन धर्माची तुलना डास, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोना यांच्याशी केली आणि तो पूर्णपणे नष्ट केला पाहिजे असे म्हटले होते. (Madras High Court) या वक्तव्यांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर तामिळनाडू पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली, मात्र हिंदूविरोधी द्वेषपूर्ण भाषण सुरू करणाऱ्याविरोधात तितकीच तत्परता दाखवली गेली नाही. ६ सप्टेंबर २०२३ रोजी तिरुचिरापल्ली पोलिसांनी अमित मालवीय यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला.(Madras High Court)
 
 
Powered By Sangraha 9.0