मुंबई : (SNDP) राज्यातील सर्वात मोठ्या हिंदू समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एझवा समाजाच्या एसएनडीपी (SNDP) योगम राज्य परिषदेने मुस्लिम लीगच्या कथित ‘धार्मिक हुकूमशाही’विरोधात तीव्र ठराव मंजूर केला आहे. मुस्लिम लीग पक्ष केवळ स्वतःच्या धार्मिक हितासाठीच कारभार करत असून संविधानाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप या ठरावात करण्यात आला आहे. हा ठराव अलप्पुझा येथील प्रिन्स हॉटेलमध्ये झालेल्या एसएनडीपी योगमच्या नेतृत्व बैठकीत मंजूर करण्यात आला.(SNDP)
विविध धार्मिक समुदायांची मते मिळवून आघाडीच्या राजकारणाच्या नावाखाली सत्तेत आलेली मुस्लिम लीग आता केवळ स्वतःच्या धर्मासाठीच राज्य करत असल्याचा आरोप करण्यात आला. धर्माच्या नावाखाली राजकीय पक्ष स्थापन करून त्यांचे संचालन करणे म्हणजे लोकशाहीचा गैरवापर असल्याचे सांगत, अशा दाव्यांना प्रगत समाजात स्थान नसलेले ‘ढोंगी नाटक’ असे संबोधण्यात आले. परिषदेने योगमचे सरचिटणीस वेल्लापल्ली नटेसन यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला. एझवा समाजाला शिक्षण व रोजगार क्षेत्रात होत असलेल्या दुर्लक्षावर त्यांनी उघडपणे टीका केली आहे. त्यांना ‘साम्प्रदायिक’ ठरवण्याचे प्रयत्न करणाऱ्या तथाकथित ‘छद्म धर्मनिरपेक्ष’ राजकारण्यांचे प्रयत्न ठरावाद्वारे फेटाळण्यात आले असून, मुस्लिम लीग धर्माचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत असल्याचा आरोप करण्यात आला.(SNDP)
काँग्रेस नेतृत्वाखालील सरकारांवरही तीव्र टीका करण्यात आली. काँग्रेस सत्तेत आल्यावर राज्याच्या एकूण उत्पन्नापैकी सुमारे ६५ टक्के खर्च करणारी खाती धार्मिक राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्र्यांकडे दिली जातात, असा दावा ठरावात करण्यात आला. शिष्यवृत्तींच्या वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोप करत, बहुसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण व सामाजिक न्यायापासून वंचित ठेवले जाते, तर करदात्यांचा पैसा अल्पसंख्याक समुदायांकडून अगदी धार्मिक शिक्षणासाठीही वापरला जात असल्याचे नमूद करण्यात आले.(SNDP)
मलप्पुरम जिल्हा कोणाचाही खासगी साम्राज्य नाही, असे सांगत सामाजिक न्यायाबाबत जागरूक असलेले लोक अशा प्रकारांना सहन करणार नाहीत, असा इशारा यावेळी देण्यात आला. मलप्पुरमसह केरळच्या प्रत्येक भागात सामाजिक न्याय, समता आणि धर्मनिरपेक्षतेची मूल्ये प्रस्थापित झाली पाहिजेत आणि सर्व घटकांना समान न्याय मिळाला पाहिजे, असे ठरावात म्हटले आहे. काही धार्मिक अल्पसंख्याक समुदाय सामूहिक मतदानशक्तीच्या जोरावर प्रभावी बहुमत ठरत असताना, बहुसंख्याक समाज खर्चाच्या क्षमतेच्या दृष्टीने विभागलेला अल्पसंख्याक ठरत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले.(SNDP)
या बैठकीत एसएनडीपी (SNDP) योगमने नायर समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नायर सर्व्हिस सोसायटी सोबत एकतेच्या दिशेने पुढे जाण्याचा निर्णयही घेतला. केरळच्या लोकसंख्येत सुमारे १२ ते १५ टक्के वाटा असलेल्या नायर समाजाचे प्रतिनिधित्व एनएसएस करते. योगमचे उपाध्यक्ष तुषार वेल्लापल्ली हे एनएसएसचे सरचिटणीस जी. सुकुमारन नायर यांची पुढील चर्चा करण्यासाठी भेट घेणार आहेत. योगमचे सरचिटणीस वेल्लापल्ली नटेसन यांनी पत्रकारांना सांगितले की, परस्पर सोयीने ही भेट लवकरच होईल. यावर प्रतिक्रिया देताना सुकुमारन नायर यांनी तुषार वेल्लापल्ली यांचे मुख्यालयात ‘मुलगा किंवा भाऊ’ म्हणून स्वागत करू, असे म्हटले.(SNDP)
या बैठकीत वेल्लापल्ली नटेसन यांच्या भूमिकेला पुन्हा एकदा पूर्ण पाठिंबा देण्यात आला. बैठकीला योगम अध्यक्ष डॉ. एम. एन. सोमन, उपाध्यक्ष तुषार वेल्लापल्ली, देवस्वोम सचिव अरयकांडी संतोष, तसेच परिषद सदस्य पी. टी. मन्मथन, संदीप पचैल, ई. एस. शीबा, बेबी राम, एबिन अंबाटील, सी. एम. बाबू, व्ही. पी. नराज, पी. एस. एन. बाबू, पी. के. प्रसन्नन, के. सुंदरन आदी उपस्थित होते.(SNDP)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक