मुंबई : ( Devendra fadnavis ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावरून परतल्यावर मुंबईत एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्रित बैठक होणार असून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या तिन्ही महानगरपालिका मध्ये महायुतीचा महापौर होण्यासंदर्भात यापूर्वीच गेल्या आठवड्यात झालेल्या भेटीत सविस्तर चर्चा झाली आहे.
भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, "तीनही महानगरपालिकेमध्ये महायुतीला जनादेश मिळाला आहे त्यामुळे या जनादेशानुसारच तीनही महानगरपालिकेत महायुतीचीच सत्ता स्थापन होणार."