महापालिका आरक्षण सोडत LIVE Update: मुंबई महापालिकेत महापौरपद खुल्या वर्गातील महिलेसाठी आरक्षित

22 Jan 2026 12:40:33


 
BMC


मुंबई : (BMC) मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले असून, यंदाचे महापौरपद खुल्या (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी राखीव असून महिलेसाठी आरक्षित असल्याची घोषणा करण्यात आली आहे. (BMC)

महापालिका निवडणूक २०२६ चे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच महापौरपदाच्या आरक्षणाची घोषणा महत्त्वाची ठरली आहे. मुंबई महापालिकेत भाजपमहायुतीने बहुमत मिळवले असून, त्यामुळे महापौरपदावर दावा कोणाचा असणार, याबाबत राजकीय समीकरणे निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहेत. दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि मनसेकडूनही रणनीती आखली जात असून, महापौर निवडीसाठी हालचाली तीव्र झाल्या आहेत. (BMC)


खुल्या वर्गासाठी आरक्षण असल्याने जातीय किंवा प्रवर्गीय अटी लागू नसून, राजकीय ताकद, संख्याबळ आणि युतीआघाडी यांवर महापौरपदाची गणिते ठरणार आहेत. (BMC)

 

Powered By Sangraha 9.0