मुंबई : (Kirit Somaiya) एमआयएम पक्षाच्या नेत्यांनी मुंब्रा येथे चिथावणीखोर भाषण केल्याबद्दल भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी त्यांच्याविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे. यावेळी आ. निरंजन डावखरे उपस्थित होते.(Kirit Somaiya)
एमआयएम पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी निकालानंतर भाषण देताना 'संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे,' असे वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्याच्या विरोधात किरीट सोमय्या आणि निरंजन डावखरे यांनी पोलिस ठाणे गाठले असून सहर शेख यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोलिसांना दाखवत कठोर कारवाई करण्याची मागणी केली.(Kirit Somaiya)
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की, "महापालिका निवडणुकीच्या विजयानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन चे नेते आता मुंब्रामध्ये भडकावू, चिथावणी देणारे भाषण करायला लागले आहेत. हम मुंब्रा को हरा बना देंगे, असे ते म्हणतात. पण मुंब्रा हे महाराष्ट्राचे आहे. (Kirit Somaiya) महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या भगव्याला नमन करतो. मुस्लिम धर्मांधता, अतिरेकी भाषणे ही चिथावणी देणारी आहेतच, परंतु मुंब्रामधील कमी संख्येत (अल्पसंख्याक) हिंदूंमध्ये भीती पसरवण्यासाठी अशी भाषणे केली जात असतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी," अशी मागणी त्यांनी यावेळी केली.(Kirit Somaiya)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....