कल्याण–डोंबिवली : (KDMC Mayor) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) महापौरपद अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः शिवसेना शिंदे गटाकडून महापौरपदावर दावा सांगणाऱ्या उमेदवारांच्या सुरक्षेसाठी आणि राजकीय दबाव टाळण्यासाठी खबरदारीची पावले उचलली जात असल्याचे चित्र आहे. माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या महापौरपदाच्या दोन प्रमुख दावेदारांना अज्ञातस्थळी नेण्याची तयारी सुरू आहे. (KDMC Mayor)
शिवसेना शिंदे गटाकडून हर्षाली जाधव आणि किरण भांगले हि दोन नावे महापौरपदासाठी चर्चेत आहेत. दोघेही अनुसूचित जमाती प्रवर्गातील असून, पक्षांतर्गत गणिते आणि संख्याबळ पाहता या दोघींपैकीच एकीच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सध्या राजकीय वातावरण तापलेले असल्याने आणि फोडाफोडीच्या चर्चांना उधाण आल्याने, दोन्ही दावेदारांना अज्ञातस्थळी हलवण्याचा निर्णय घेतला जात असल्याचे माध्यमांवरून सांगण्यात येत आहे. (KDMC Mayor)
संभाव्य दबाव, संपर्क प्रयत्न किंवा राजकीय उलथापालथ टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे. याआधीही राज्यातील विविध महापालिकांमध्ये सत्तास्थापनेदरम्यान नगरसेवकांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्याच धर्तीवर केडीएमसीतही शिंदे गटाकडून ही रणनीती आखली जात असल्याचे दिसते. (KDMC Mayor)
दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत महापौरपद एसटी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजप, शिवसेना शिंदे गट, मनसे आणि इतर पक्षांचे संख्याबळ लक्षात घेता, महापौर कोण होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शिंदे गटाने यावेळी महापौरपदावर आपलाच दावा मजबूत असल्याचा विश्वास व्यक्त केला असून, लवकरच अधिकृत नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. (KDMC Mayor)