Jharkhand Naxal Encounter : झारखंडमध्ये नक्षलवादी चळवळीला दणका! १ कोटींचं बक्षीस असलेल्या 'तुफान'सह १६ नक्षलवादी ठार

22 Jan 2026 20:47:20

Jharkhand Naxal Encounter

मुंबई : (Jharkhand Naxal Encounter) झारखंडच्या सारंडा जंगल परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या तीव्र चकमकीत १५ नक्षलवादी ठार झाले आहेत. या कारवाईत नक्षलवादी चळवळीचा मास्टर माईंड आणि केंद्रीय समिती सदस्य अनल ऊर्फ तुफान ऊर्फ पतिराम मांझी याच्यासह १६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. त्याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, अशी माहिती आहे. (Jharkhand Naxal Encounter)
अत्यंत घनदाट जंगलात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सीआरपीएफच्या विशेष पथकासह झारखंड, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली. सुरुवातीला नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.(Jharkhand Naxal Encounter)
कारवाईदरम्यान घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. ही संयुक्त मोहीम अद्याप सुरू असून परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद समूळ नष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले असतानाच, सुरक्षा दलांनी झारखंडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे.(Jharkhand Naxal Encounter)


Powered By Sangraha 9.0