Devendra Fadnavis: एकूण १८ देशांमधून महाराष्ट्रात ३० लाख कोटींची गुंतवणूक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

22 Jan 2026 19:10:14
 
Devendra Fadnavis
 
दावोस : (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर असून, गुरूवार दि. २२ जानेवारी रोजी दावोस येथून लाईव्ह संवाद साधत त्यांनी राज्याला दावोस दौऱ्याची माहिती दिली. हा दौरा अत्यंत यशस्वी ठरल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्रात झालेल्या मोठ्या गुंतवणुकीच्या घोषणांवर समाधान व्यक्त केले. (Devendra Fadnavis)
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या दौऱ्यात त्यांच्या सोबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, तसेच एमएमआरडीए आणि सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी झालेल्या चर्चांमधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Devendra Fadnavis)
 
हेही वाचा : Municipal Corporation : मुंबईसह राज्यातील प्रमुख महानगरपालिकांमध्ये महिलाराज; २९ महापालिकांच्या महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर
 
“मला सांगाताना आनंद होत आहे की, या दौऱ्यात ज्या गुंतवणुकीच्या घोषणा करण्यात आल्या आहेत, त्या जवळपास ३० लाख कोटी रुपयांच्या आहेत. याशिवाय आणखी ७ ते १० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू असून, पुढील एक-दोन महिन्यांत त्या एमओयूच्या टप्प्यापर्यंत पोहोचतील,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. (Devendra Fadnavis)
 
या गुंतवणुकीमध्ये उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र, कृषी क्षेत्र, तंत्रज्ञान यांचा समावेश असून, सुमारे ८३ टक्के करार हे थेट परकीय गुंतवणूक (FDI) स्वरूपातील आहेत. तर सुमारे १६ टक्के गुंतवणूक ही आर्थिक व तांत्रिक संस्थांसोबतची असून, त्यामध्ये एफडीआय कमी असली तरी अत्याधुनिक परदेशी तंत्रज्ञानाचा मोठा सहभाग आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis)
 
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण १८ देशांमधून महाराष्ट्रात गुंतवणूक येणार आहे. यामध्ये अमेरिका, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम, स्वीडन, सिंगापूर, नेदरलँड्स, जपान, इटली, डेन्मार्क, नॉर्वे, स्पेन आदी देशांचा समावेश आहे. (Devendra Fadnavis)
 
दावोस दौऱ्यामुळे महाराष्ट्राची जागतिक गुंतवणूक नकाशावर अधिक भक्कम ओळख निर्माण झाली असून, आगामी काळात रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल. (Devendra Fadnavis)
 
 
Powered By Sangraha 9.0